चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर विरुद्ध आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यादरम्यान आयपीएल २०२१ मधील दहावा सामना खेळला गेला. हा सामना आरसीबीने ३८ धावांनी जिंकून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात यावर्षी प्रथमच आरसीबीसाठी खेळत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. मॅक्सवेलने अर्धशतक ठोकल्यानंतर ट्विटरवर चाहत्यांनी पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा हिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
मॅक्सवेलचे सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक
आरसीबीचा मधल्या फळीतील फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने संघ अडचणीत असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघासाठी सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत दरम्यान ४९ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार व ३ उत्तुंग षटकार खेचले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. मॅक्सवेलने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातही ५४ धावांची खेळी केली होती. हंगामातील व आरसीबीसाठीच्या आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने ३९ धावांची खेळी केलेली.
प्रीती झिंटा होतेय जोरदार ट्रोल
मॅक्सवेलच्या धमाकेदार कामगिरीनंतर चाहत्यांनी ट्विटरवर पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा हिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण, मॅक्सवेल मागील वर्षी पंजाब संघाचा भाग होता. पंजाबसाठी त्याने मागील वर्षी तेरा सामने खेळताना केवळ १०८ सामने खेळले होते. विशेष म्हणजे या सामन्यांमध्ये त्याला एकही षटकार मारत आला नव्हता. याच कारणाने पंजाबने त्याला करारमुक्त केला होता.
त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावामध्ये आरसीबीने त्याच्यासाठी १४ कोटींची मोठी बोली लावून आपल्या संघात सामील करून घेतले होते.
https://twitter.com/memegineers_/status/1383734799781687298
https://twitter.com/LazyyKrishna/status/1383750808773095428
https://twitter.com/akshayuniverse2/status/1383752620041412614
#RCBvKKR
Preity Zinta while watching Maxwell's batting pic.twitter.com/HhtXbHwRWh— Prasad (@munna_30_) April 18, 2021
https://twitter.com/thenileshkolage/status/1383753583221370891
Maxwell playing consecutive big knocks for RCB
Meanwhile, Preity Zinta to Maxwell – pic.twitter.com/fV3Nfq1J7c— सरकार (@irony_boi_) April 18, 2021
Preeti Zinta after seeing maxwell's performance this season#RCB #PlayBold pic.twitter.com/r3Qp7YuKsb
— Ashu (@xashu14) April 18, 2021
Preity Zinta after selling Glenn Maxwell. pic.twitter.com/vdBJJvM2jM
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) April 18, 2021
आरसीबीचा मोठा विजय
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार हे दुसऱ्या षटकात माघारी परतले. तिसऱ्या गड्यासाठी सलामीवीर देवदत्त पडिक्कल व ग्लेन मॅक्सवेल यांनी ८५ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने संघासाठी सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. एबी डिव्हिलियर्सच्या ३४ चेंडूतील ७६ धावांमुळे आरसीबीने ४ बाद २०४ धावा उभारल्या.
प्रत्युत्तरात, केकेआरचे फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर ही नियमित अंतराने बाद होत राहिले. ओएन मॉर्गन, शाकिब अल हसन आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, मोहम्मद सिराज व हर्षल पटेल यांच्या अखेरच्या दोन षटकातील किफायतशीर गोलंदाजीने सामना आरसीबीच्या पारड्यात गेला.






