जयपूर। 2019 चा आयपीएल लिलाव आज(18 डिसेंबर) जयपूरमध्ये सुरु आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक बोली पहायला मिळाल्या.
आयपीएल लिलावात मागीलवर्षी सर्वात महागडा ठरलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकतला यावर्षीही मोठी बोली लागली असून त्याला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात परत घेतले आहे.
उनाडकतला मागीलवर्षीही राजस्थानने 11.5 कोटीची बोली लावत संघात सामील करुन घेतले होते. पण त्यांनी यावर्षी त्याला लिलावासाठी मुक्त केले होते. त्याची 1.5 कोटी ही मुऴ किंमत होती.
मागील आयपीएलच्या हंगामात उनाडकतने फारसी चांगली कामगिरी केली नव्हती. त्याने 15 सामन्यात 44.18च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्याची ही कामगिरी बघता आता त्याला मिळालेली रक्कम यावर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
यामुळे उनाडकत तसेच आयपीएललाही चाहते ट्विटरवर चांगलेच ट्रोल करत आहेत. एकाने तर उनाडकतने राजस्थानवर नक्की जादू-टोना केला असणार असे ट्विट केले आहे.
https://twitter.com/CricketTweetsIN/status/1074987966659870725
https://twitter.com/iPrince55/status/1074987821125890048
Rajasthan Royals buying Jaydev Unadkat for 8.4 cr…#IPLAuction pic.twitter.com/U8dYtpT0eX
— Chinmay Jawalekar (@CricfreakTweets) December 18, 2018
Economy of 9.65 during IPL 2018
Average of over 44
11 wickets in 15 matches
Jaydev Unadkat gets sold for 8.4 Crores.IPL, you drunk, bro?
— Ketan | کیتن (@Badka_Bokrait) December 18, 2018
Jaydev Unadkat'e economy in IPL is 9.2. his bidding price of 8.4cr just fell short of that! Horrendous! @cricbuzz #IPLonCricbuzz #IPLAuction
— Anupam Singh (@Anupam_MaxFac) December 18, 2018
Decent bowler like Ishant Sharma is sold for 1.1 cr and maha ghatiya bowler like Jaydev Unadkat is sold for 8.4 cr. What a scam !! #IPLAuction
— Funnily Serious (@notionalview) December 18, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–चेन्नई एवढा तगडा संघ परंतु आतापर्यंत केलाय एकच खेळाडू केलाय खरेदी
–आयपीएल २०१९ लिलाव: युवराजसह या ५ महान खेळाडूंना नाही कुणीही वाली
–मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आतापर्यंत हे ३ मोठे खेळाडू