यपीएल 2023 मध्ये गुरुवारी (13 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना खेळला गेला. मोहली येथे झालेल्या या सामन्यासाठी गुजरात संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याला संधी दिली गेली. तब्बल तीन वर्षाच्या कालावधीनंतर तो आयपीएल खेळताना दिसला. त्याच्या पुनरागमनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्या नावाची चर्चा रंगली.
या सामन्यासाठी युवा यश दयालच्या जागी अनुभवी मोहित शर्मा याला संधी मिळाली. एकेकाळी भारतीय संघाचा तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स व किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला मोहित मागील तीन हंगामापासून आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता. मात्र, यावेळी त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळाली.
आयपीएल 2020 मध्ये त्याने पंजाबविरुद्ध दिल्लीसाठी आपला अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तब्बल 935 दिवसांच्या कालावधीनंतर मैदानात उतरत त्याने दमदार खेळ दाखवला. या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीची जुनी धार दाखवली. आपल्या 4 षटकात त्याने केवळ 18 धावा देत जितेश शर्मा व व सॅम करन यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले.
त्याच्या पुनरागमनानंतर एका चाहत्याने लिहिले,
https://twitter.com/nani71224/status/1646541170896687104?t=tMcHjYySUqFCqfNN4IESKQ&s=19
‘2014 चा पर्पल कॅप विजेता पुन्हा आला आहे’
दुसऱ्या एकाने लिहिले,
https://twitter.com/VishalJeswani14/status/1646547985109745674?t=cgwUpRR0bvsymPsdM6N6QQ&s=19
‘अमित मिश्रा, पियुष चावला व आता मोहित शर्मा यांना पाहून जुने दिवस आठवले.’
मोहितने 2013 मध्ये चेन्नईसाठी खेळताना 23 बळी मिळवले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून 2014 टी20 विश्वचषक व 2015 वनडे विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, 2015 नंतर त्याला भारतीय संघाकडून खेळता आले नाही. 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना त्याने पर्पल कॅप जिंकण्याचा कारनामा केला होता.
(Twitter Reacts After Mohit Sharma Comeback In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“तो निःसंकोचपणे नंबर 1”, भारतीय दिग्गजाने बटलरवर उधळली स्तुतीसुमने तब्बल 935 दिवसानंतर आयपीएल रणांगणात उतरला धोनीचा ‘हुकमी एक्का’! यावेळी हार्दिकने दिली संधी