सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(3 जानेवारी) चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या सामन्यात सलामीला संधी देण्यात आलेला केएल राहुल पुन्हा एकदा मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. त्याला या सामन्याच्या दुसऱ्याच षटकात 9 धावांवर असताना जोश हेजलवूडने बाद केले. त्यामुळे केएल राहुलवर चाहत्यांनी अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये 1 तासात जवळपास 5 हजारांपेक्षाही जास्त ट्विट केएल राहुलच्या बाबतीत झाले आहेत.
राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीमध्येही सलामीला फलंदाजी केली होती. पण तेव्हाही त्याला खास काही करता आले नव्हते. त्याने पहिल्या दोन कसोटीत मिळून फक्त 48 धावा केल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
आज सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करणारा मयंक अगरवालही चांगलाच ट्रेंडीग आहे. त्याच्याबरोबरच चेतेश्वर पुजाराही ट्विटर ट्रेंडमध्ये आहे.
तसेच या सामन्यात भारताचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवलाही इशांत शर्मा ऐवजी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तोही या ट्विटर ट्रेंडमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?
–सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकरांचे मुंबईत निधन
–ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया