---Advertisement---

‘तुला एवढीच अक्कल आहे तर कोच का नाही बनत’, जोफ्रा आर्चर ‘त्या’ खेळाडूवर कडाडला

On: रविवार, जुलै 12, 2020 6:06 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात साउथँम्पटन येथे पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघात अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संधी मिळाली नाही. त्यावरुन इंग्लंडचा वेगवान युवा गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज टिनो बेस्ट यांच्यात शुक्रवारी रात्री ट्विटरवर चकमक झालेली पहायला मिळाली.

शुक्रवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जोफ्रा आर्चरला एकही विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर बेस्टने ट्विट केले की ‘ब्रॉडच्या जागी आर्चर का खेळत आहे कारण वुड 90 पेक्षा जास्त गतीने गोलंदाजी करीत आहे. तो ब्रॉडप्रमाणेच वेगवान गोलंदाजी करतोय. त्यामुळे ब्रॉड चिडला तरी मला काही हरकत नाही.’

https://twitter.com/tinobest/status/1281589693398884353

आर्चरला बेस्टचे हे बोलणे पटले नसल्याने त्याने त्याला उत्तर देत ट्विट केले, ‘इतकी माहिती असूनही तू अद्याप प्रशिक्षक का झाला नाही?’

यानंतर बेस्टनेही आर्चरला उत्तर दिले. बेस्टने ट्विट केले की ‘त्यानंतर बेस्टने लिहिले, “माझ्यावर वैयक्तिकरित्या हल्ला करु नको. खरं म्हणजे तू चांगली गोलंदाजी करत नाही आणि अ‍ॅशेसपासून तू वेगाने गोलंदाजी केलेली नाही. आता जा आणि आराम कर. ‘

https://twitter.com/tinobest/status/1281703741327052800

यानंतर काहीवेळाने आर्चरने बेस्टला उत्तर म्हणून नाही, पण ‘तू दु: खी जीवन जगले पाहिजे’ अशा अर्थाचा ट्विट केला होता.

या सामन्यात इंग्लंडच्या संघात जागा न मिळाल्याने याआधीच ब्रॉडने निराशा तसेच राग व्यक्त केला होता.

तसेच याआधीही डिसेंबर 2019 मध्ये ट्विटरवर बेस्ट आणि आर्चरमध्ये वाद झाला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

टीम इंडियासमोर नागिन डान्स करणाऱ्या संघाच्या खेळाडूंवर उपासमारीची वेळ, आता…

अमिताभसाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाचे कौतूक तर कोहलीला शिव्या…

…तेव्हा संघाबाहेर असलेल्या सौरव गांगुलीच्या समर्थनार्थ देशात निघाल्या होत्या रॅली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---