---Advertisement---

त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’

---Advertisement---

भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे.

या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची गुरुवारी (२६ जुलै) घोषणा करण्यात आली.

या इंग्लंड संघात भारताविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या आदिल रशिदचा समावेश करण्यात आला आहे.

आदिल रशिदच्या या आश्चर्यकारक निवडीमुळे क्रिकेट विश्लेषकांसह अनेकांनी आदिल रशिदच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

https://twitter.com/Aatish_p22/status/1022441193777635328

तसेच आदिल रशिदची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे कसोटी संघात निवड झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आघाडीवर आहे.

आदिल रशिदने आजपर्यंत १० कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दहा सामन्यात रशिदने ३८ बळी मिळवले आहेत. विशेष म्हणजे रशिद या दहा पैकी सर्व सामने इंग्लंड बाहेर खेळला आहे.

असा आहे पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ-

जो रुट (कर्णधार), अॅलिस्टर कुक, केटॉन जेनिंग्स, डेव्हीड मालन, जॉनी बेअस्ट्रो (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोइन अली, जोस बटलर, आदिल रशिद, सॅम करन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅंडरसन, जिमी पोर्टर.

महत्त्वाच्या बातम्या-

-इम्रान खानच काय, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफदेखील खेळायचे क्रिकेट

-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment