---Advertisement---

धक्कादायक! नितिश राणाच्या पत्नीचा तरूणांनी केला पाठलाग, वाचा सविस्तर

On: शनिवार, मे 6, 2023 1:09 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 स्पर्धा आता रोमांचक वळणावर पोहोचली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मागील दोन सामने जिंकत मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला असून, कर्णधार नितिश राणा देखील चांगली कामगिरी करताना दिसतोय. असे असतानाच राणा याच्या कुटुंबाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीये. राणाच्या पत्नीचा दोन तरुणांनी रात्रीच्या वेळी पाठलाग केला. ही घटना दिल्ली येथे घडली.

राणा याची पत्नी सांची मारवाह हिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून याबाबत माहिती दिली. त्या स्टोरी नुसार, ही घटना दिल्लीच्या किर्ती नगर भागात घडली. सांची आपल्या कारमधून घरी परतत असताना दुचाकीवर असलेल्या दोन तरुणांनी तिचा पाठलाग केला. इतकेच नव्हे तर तिच्या कारला टक्कर देखील दिली.

 

याबाबत पोलिसांना सांगितले असता त्यांनी, तुम्ही घरी पोहोचला आहात मग जास्त विचार करू नका. पुढील वेळी नक्की त्या गाडीचा क्रमांक नोंद करा असे उत्तर दिले. पोलिसांनी सहकार्य न केल्याने सांची नाराज झाल्याचे दिसले.

सांची आणि नितीश यांचा विवाह 2020 मध्ये झाला आहे. सध्या नितीश केकेआर संघाचे नेतृत्व करत असून, प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी केकेआर ला पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. स्वतः नितिशची कामगिरी या आयपीएलमध्ये दमदार झालेली‌ दिसून येते. त्याने आतापर्यंत हंगामात 10 सामने खेळताना 275 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याकडे या हंगामात नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे केकेआरने 10 सामने खेळताना केवळ चार विजय मिळवले आहेत. असे असले तरी उर्वरित चार सामने जिंकून प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरू शकतात. ‌

(Two Boys Chase Nitish Rana Wife Sanchi Marwah In Delhi)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

“ऍटीट्यूडमुळे मला केले गेलेले संघाबाहेर”, स्वतः हार्दिकने केला खळबळजनक खुलासा 
‘गोल्डन बॉय’ नीरजने पुन्हा उंचावली भारताची मान! डायमंड लीगमध्ये फेकला विक्रमी भाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---