जुलै २०, अर्थातच आजचा दिवस भारतीय क्रिकेट रसिकांसाठी अतिशय खास ठरणार आहे. आजच्या दिवशी २ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघांविरुद्ध भारताचे २ वेगवेगळे संघ क्रिकेट सामना खेळणार आहेत.
भारताचा मुख्य संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील हा संघ आजपासून इंग्लंडमध्ये कसोटी स्वरुपातील सराव सामना खेळणार आहे. तर दुसरीकडे युवा खेळाडूंची भरमार असणारा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील हा संघ आज श्रीलंकामध्ये मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना खेळणार आहे. अर्थातच एका वेळी भारताचे २२ खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे.
धवन आणि त्याचा संघ श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर दुसरा वनडे सामना खेळणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होणार आहे. तत्पुर्वी २.३० वाजता या सामन्यासाठी नाणेफेक होईल. हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचे धवनसेनेचे लक्ष्य असेल. कारण यापुर्वी १८ जुलै रोजी भारतीय संघाने श्रीलंकाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. हा सामना भारताने ७ विकेट्सने जिंकत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
याचवेळी इंग्लंडमध्ये कोहली आणि त्याचा संघ काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळताना दिसेल. हा सामना भारतूय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. हा ३ दिवसीय सामना २२ जुलै रोजी संपेल. त्यानंतर भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात! आयर्लंडच्या १०व्या आणि ११व्या क्रमांकावरील फलंदाजांनी चिवट झुंज देत केला ‘हा’ विश्वविक्रम
भारतीय समालोचकानेच लाईव्ह सामन्यात भुवीला म्हटले ‘म्हातारा’, आयपीएलच्या भिडूने घेतला समाचार
भारताला विश्वचषक जिंकून देणारा असा खेळाडू, ज्याला कधीच मिळाले नाही कामगिरीचे श्रेय