---Advertisement---

पदार्पणवीर सुंदर आणि नटराजनची कमाल! ७१ वर्षांपुर्वीच्या ‘त्या’ मोठ्या विक्रमाची केली पुनरावृत्ती

On: शनिवार, जानेवारी 16, 2021 11:04 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना शुक्रवारपासून (१५ जानेवारी) द गॅबा स्टेडियमवर चालू झाला आहे. या सामन्याचा आज (१६ जानेवारी) दुसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लॅब्यूशाने याने झुंजार शतकी खेळी केली आहे. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या इतर खेळाडूंना जास्त वेळ मैदानावर टिकू दिले नाही. यादरम्यान भारताचे पदार्पणवीर टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मोठा विक्रम नावे केला आहे.

युवा वेगवान गोलंदाज नटराजन याने २४.२ षटके गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या आहेत. यासाठी त्याने ७८ धावा दिल्या. यातील ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज लॅब्यूशानेची विकेट महत्त्वपुर्ण ठरली. तर युवा फिरकीपटू सुंदर याने ३१ षटकात ८९ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले. सुंदर आणि नटराजन या दोघांनीही या सामन्यातून कसोटी पदार्पण केले आहे.

यासह या दोन्ही गोलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटी डावात प्रत्येकी ३ विकेट्स घेत खास विक्रमाची आपल्या नावावर नोंद केली आहे. पदार्पणाच्या कसोटी डावात एकाच संघातील दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेण्याचा मोठा विक्रम नटराजन आणि सुंदर यांच्या नावावर झाला आहे. त्यांच्यापुर्वी भारतीय दिग्गज मंटू बॅनर्जी आणि गुलाम अहमद यांनी हा विक्रम नोंदवला आहे.

कोलकाता येथे १९४९ मध्ये भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना झाला होता. या सामन्यातून बॅनर्जी आणि अहमद यांनी भारतीय कसोटी संघात पाऊल ठेवले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात त्यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेत हा मोठा विक्रम नोंदवला होता.

मार्नस लॅब्यूशानेचे शानदार प्रदर्शन

ऑस्ट्रेलिया संघाच्या पहिल्या डावात सलामीवीर डेविड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड यांना संघाला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लॅब्यूशानेने बचावात्मक पण आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकले. २०४ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने त्याने १०८ धावा केल्या. याबरोबरच कर्णधार टीम पेनने अर्धशतकी खेळी केली. इतर फलंदाजांना ५० धावांचा आकडाही गाठता आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : शेपूट वळवळलं; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात

AUS v IND : कसोटी मालिकेत चारही सामन्यात खेळलेल्या खेळाडूंचा होऊ शकता ‘असा’ ११ जणांचा संघ

ब्रिस्बेन कसोटी दरम्यान मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या रिषभ पंतवर भडकले ‘हे’ दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---