इंडियन प्रीमियर लीगबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वर्षातून दोनदा आयपीएल आयोजित करण्याची योजना आखत आहे. येत्या 22 मार्चपासून लीगचा 17 वा हंगाम खेळवला जाईल. पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान असणार आहे.
येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, याआधी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे एका वर्षात दोन आयपीएल घेण्याबाबत बोलले होते. एका वर्षात दोन आयपीएलबद्दल पहिल्यांदा रवी शास्त्रीचं बोलले, असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. या लीगची लोकप्रियता लक्षात घेता एका वर्षात लवकरच दोन आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं, असं ते म्हणाले होते.
तसं पाहिलं तर, बीसीसीआयसमोर दोन आयपीएलसाठी योग्य विंडो शोधणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. वर्षभरात दोन आयपीएल खेळणं त्याच वर्षी शक्य होईल ज्या वर्षी आयसीसीची कोणतीही स्पर्धा नसेल किंवा अनेक द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या गेल्या नसतील. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. मात्र, ते पर्याय शोधण्याबाबतही बोलले आहेत. “आम्हाला 84 सामने आणि नंतर 94 सामन्यांसाठी विंडो शोधण्याची गरज आहे,” असं ते म्हणाले.
एका वर्षात दोन आयपीएलसाठी विंडो शोधणं बीसीसीआयसाठी निश्चितच सोपं जाणार नाही. त्यामुळे हे शक्य आहे की BCCI दुसऱ्या आयपीएलचं आयोजन टी 20 ऐवजी टी 10 फॉरमॅटमध्ये करू शकतं. अशा परिस्थितीत कमी वेळेत सामने होऊ शकतात. मात्र, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी टी-10 फॉर्मेटबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याची पुष्टी केली आहे. तसेच भविष्यात कोणताही निर्णय खेळाच्या हिताचा विचार करून घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दोन आयपीएलच्या बातम्यांवर अद्याप कोणत्याही खेळाडूची प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 चा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण? दोघांमध्ये आहे तब्बल 23 वर्षांचं अंतर!
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ