Shahid Afridi Statement on Virat Kohli Retirement: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वी 2 दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीने (12 मे) रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, तर त्याच्या 5 दिवस आधी म्हणजेच (7 मे) रोजी रोहित शर्मानेही आपला कसोटी कारकिर्द संपवण्याचा निर्णय घेतला. (Virat Kohli Test Retirement)
या 2 दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीवर पाकिस्तानचे 2 माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि शाहिद आफ्रिदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Shahid Afridi reaction on Kohli retirement)
पाकिस्तानचे महान फलंदाज जावेद मियांदाद यांचे मत आहे की विराट कोहली अजूनही 2027 पर्यंत सहज खेळू शकला असता. त्यांनी सांगितले की कोहलीने अचानक निवृत्ती घेतल्याने वाटते की यामागे काहीतरी वेगळी कारणं असू शकतात. “टेलिकॉम एशिया स्पोर्ट”शी बोलताना त्यांनी म्हटले की विराट कोहलीला आधुनिक क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडू म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्याने आपल्या नेतृत्व आणि फलंदाजीने भारताला अनेक सामने जिंकून दिले. असे खेळाडू अचानक निवृत्ती घेतात, तेव्हा नक्कीच काहीतरी कारण असते. मला वाटते तो अजून दोन वर्षे आरामात खेळू शकला असता. प्रत्येक महान खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येत असतात. (Javed Miandad on Kohli)
शाहिद आफ्रिदीने कोहलीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की विराटला आणखी सन्मान मिळायला हवा होता. आफ्रिदीने कोहलीचे कौतुक करत सांगितले की त्याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. आफ्रिदीच्या मते कोहलीने आपल्या एकट्याच्या जोरावर अनेक सामने जिंकले आहेत आणि तो एक वेगळ्याच स्तराचा खेळाडू आहे. आफ्रिदी म्हणाला, “विराट कोहलीकडे दुर्लक्ष करता येत नाही. तो कायम जोशात असतो, कधी-कधी वादग्रस्तही ठरतो, पण त्याने भारतीय संघासाठी खूप काही केले आहे. अशा प्रकारचे खेळाडू क्वचितच पाहायला मिळतात आणि त्यांना खास सन्मान मिळायलाच हवा. लग्नानंतर तो अधिक परिपक्व झाला. त्याला अधिक सन्मान मिळायला हवा होता.” (Shahid Afridi reaction on Kohli retirement)






