२०१५ सालच्या प्रो-कबड्डी विजेत्या यु- मुंबा संघाने दोन महाराष्ट्रीयन खेळाडूंना पहिल्या दिवशीच्या लिलावानंतर संघात स्थान दिले आहे. ४ कोटी या एकूण रकमेपैकी तब्ब्ल ७६.५० लाख खर्च करून यु मुंबाने संघात काशिलिंग आडके आणि नितीन मदनेला यांना घेतले. त्यात काशिलिंग आडकेला ४८ लाख तर नितीन मदनेला २८.५० लाख रुपये मोजण्यात आले. विशेष म्हणजे हे दोंन्ही खेळाडू सांगली जिल्ह्यातील आहे.
काशिलिंग आडके
हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या २४ वर्षीय काशिलिंग आडकेने यापूर्वी दबंग दिल्लीकडून खेळताना ५२ सामन्यात ४०६ गुणांची कमाई केली आहे. त्यातील तब्बल ३८० गुण हे रेडच्या माध्यमातून तर २६ बचावाच्या माध्यमातून आले आहे. काशीलिंगला पहिल्या मोसमात १० लाख रुपयांची बोली लावून दबंग दिल्ली संघाने घेतले होते.
https://twitter.com/U_Mumba/status/866692438882230272
नितीन मदने
प्रो कबड्डी स्पर्धेत खेळताना २५ सामन्यांत १६० गुणांची कमाई केली. त्यात १५२ गुण त्याने रेडच्या माध्यमातून तर ८ गन बचावातून मिळविले.नितीनचा जन्म १० सप्टेंबर १९८८ रोजी झाला असून गेल्या मोसमात त्याने बेंगाल वॉरियर्स संघाकडून कौशल्य पणाला लावली होती. नितीन मदने महाराष्ट्रातील असून तो भारताकडून आशियायी क्रीडा स्पर्धेत खेळलेला आहे.
https://twitter.com/U_Mumba/status/866696178699829248