श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे, तर सूर्यकुमार यादवकडे टी20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
टी20 विश्वचषकानंतर गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. तो येताच टीम इंडियात अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. गंभीर येताच कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळालं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयस अय्यर आणि हर्षित राणा यांचा संघात समावेश करण्यात आलाय. हे दोघेही केकेआर टीमचा महत्त्वाचा भाग आहेत. केकेआरनं श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं. गंभीर या संघाचा मार्गदर्शक होता. आता गंभीरनं टीम इंडियात प्रवेश करताच अय्यर आणि राणाला संघात संधी मिळाली.
देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआयनं श्रेयस अय्यरला केंद्रीय करारातून बाहेर केलं होतं. आता त्याचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. श्रेयस अय्यरनं डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानं आतापर्यंत टीम इंडियासाठी 59 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यानं 5 शतकं आणि 18 अर्धशतकांच्या मदतीनं 2383 धावा ठोकल्या.
अय्यर टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर एकदम फिट बसतो. त्यानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 33 एकदिवसीय सामन्यात 1397 धावा केल्या आहेत. या स्थानावर त्याच्या नावे 4 शतकं आणि 8 अर्धशतकं आहेत. याशिवाय त्यानं तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावरही फलंदाजी केली आहे.
हर्षित राणा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो आयपीएलमध्ये केकेआर आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. राणानं 14 लिस्ट ए सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. एका सामन्यात 17 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय त्यानं प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“त्याचं शुबमन गिलसारखं नशीब कुठे…”, माजी मुख्य निवडकर्त्याचे भारतीय संघ व्यवस्थापनावर ताशेरे
शतकवीरांनाच केलं बाहेर, टीम इंडियाच्या संघ निवडीवरुन भडकले काँग्रेस खासदार शशी थरूर
बीसीसीआयचा योग्य निर्णय, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्याची 3 कारणं जाणून घ्या