गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघात अनेक नव्या खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. युवा खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे वरिष्ठ खेळाडूंची मात्र पंचाईत होते. खासकरून असे खेळाडू, जे फॉर्मसाठी झगडत असतात.
भारतीय संघातही असे दोन खेळाडू आहेत, जे एकेकाळी टीम इंडियाचे बॅकबोन होते. या खेळाडूंनी अनेकदा भारतासाठी मॅचविनिंग कामगिरी केली आहे. मात्र आता त्यांना टीममध्ये स्थान मिळणं तर दूरच, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याची वेळ आली आहे. चला तर मग हे दोन क्रिकेटपटू कोण? हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
शिखर धवन – एकेकाळी टीम इंडियाचा नियमित सदस्य राहिलेला शिखर धवन आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे. 38 वर्षीय धवननं 2022 पासून भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. शिखर धवननं 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याची आणि रोहित शर्माची ओपनिंग जोडी खूपच हिट ठरली होती. या दोघांनी सलामीला खेळताना अनेक विक्रम रचले आहेत. मात्र आता धवनला पुन्हा भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
शिखर धवननं वनडेमध्ये भारतासाठी 17 शतकं व 39 अर्धशतकांच्या मदतीनं 6793 धावा ठोकल्या आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावे 7 शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीनं 2315 धावा आहेत. धवननं टी20 मध्ये 1759 धावा ठोकल्या आहेत, ज्यामध्ये 11 अर्धशतकांचा समावेश आहे.
भुवनेश्वर कुमार – 2012 मध्ये भारतासाठी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या वेगवान गोलंदाजानं भल्याभल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं आहे. चेंडू दोन्ही दिशेला स्विंग करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भुवीनं भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. भुवनेश्वरनं 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून त्यानं भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. कसोटीनं भुवीनं 63 बळी घेतले आहेत. तर एकदिवसीय आणि टी20 मध्ये त्याच्या नावे अनुक्रमे 114 आणि 90 विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सुट्टी संपली, कामावर या! टीम इंडियाचा नवा हेडमास्तर गंभीरचा विराट, रोहित अन् बुमराहला मॅसेज
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतासाठी ओपनिंग कोण करणार? हे 4 दावेदार रेसमध्ये