आपण अनेकदा फलंदाजांनी वापरलेल्या विविध बॅटची चर्चा करत असतो. पण क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूमध्येही विविधता असते. बऱ्याचदा देशानुसार चेंडूंचे प्रकार बदलतात. चेंडू तयार कसा होतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. वेगवेगळ्या परिस्थितीत चेंडूला लावलेले लेदर मोठी भूमिका निभावते.
क्रिकेटमधील चेंडू कोर्कने बनवलेला असतो. त्याला आयसीसीच्या नियमानुसार लेदर लावले जाते. कॉर्कचा वापर टिकाऊपणा आणि उसळी मिळण्यासाठी केला जातो. तसेच चेंडू बनवण्यासाठी सहसा लेदरचे चार तुकडे वापरतात. तसेच चेंडूच्या मध्यभागी लेदरची शिवण असते.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूंचे वजन सुमारे ०.१६ किलोग्रॅम किंवा १६० ग्रॅम असते. आंतराष्ट्रीय क्रिकेटचे चेंडू प्रामुख्याने ३ कंपन्या बनवतात. त्यांच्याच नावावरुन तीन वेगवेगळे चेंडू ओळखले जातात. त्याचाच आपण या लेखात आढावा घेणार आहोत.
क्रिकेटमध्ये वापरले जाणारे विविध प्रकारचे चेंडू –
कुकाबुरा चेंडू –
कुकाबुराची स्थापना १८९० ला झाली. या कंपनीचे संस्थापक एजी थाॅम्पसन यांचा कुकाबुरा पक्षी ‘जॅकी’ वरुन कपंनीचे नाव कुकाबुरा ठेवण्यात आले. ही कंपनी कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारासाठी चेंडू तयार करते. कुकाबुरा सध्या जगातील अव्वल क्रमांकाची क्रिकेट चेंडू बनवणारी कंपनी आहे. क्रिकेट व्यतिरिक्त ते हॉकीचा चेंडूही तयार करतात.
लाल कुकाबुरा चेंडूचे वजन सुमारे 156 ग्रॅम असते आणि ते मशीनमध्ये तयार केले जातात. या चेंडूंची शिवण कमी असते. पण जास्तीत जास्त ३० षटके चेंडू स्विंग होण्यास या चेंडूने मदत होते. कुकाबुरा चेंडू अरुंद शिवण असल्यामुळे झटकन स्विंग गमावतात. हे चेंडू काहीप्रमाणात फिरकीपटूंनाही मदत करतात. चेंडू जेवढा जूना होत जातो, तेवढे तो फलंदाजांला खेळण्यासाठी सोपा जातो.
ड्यूक चेंडू –
१७६० पासून ड्यूक क्रिकेट चेंडू बनवायला सुुरुवात झाली. या चेंडूचे उत्पादन टॉनब्रिज येथे सुरु झाले. हे चेंडू हाताने तयार केले जातात. इंग्लंडमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० साठी ड्यूक कंपनीचे चेंडू वापरले जातात. तसेच हा चेंडू बनवताना त्याला लाखेचा लेपही दिला जातो. त्यामुळे हा कसोटीसाठी वापरण्यात येणार हा चेंडू गडद लाल रंगाचा दिसतो.
इंग्लंडच्या वातावरणामध्ये अन्य दुसऱ्या चेंडूंच्या तुलनेत ड्यूक चेंडूला अधिक वळण मिळते. तसेच चेंडूची चमक लवकर जात नसल्याने हे चेंडू खेळताना फलंदाजाची परिक्षा पाहिली जाते. हा चेंडू जूना झाल्यावर गोलंदाजांना रिवर्स स्विंग मिळतो.
ड्यूक ही इंग्लंडमधील क्रिकेट चेंडू बनवणारी आघाडीची कंपनी आहे.
सन्सपेरिल्स ग्रीनलँड्स (एसजी) चेंडू –
सन्सपेरिल्स कंपनीची स्थापना १९३१ मध्ये केदारनाथ आणि द्वारकानाथ आनंद यांनी सियालकोट येथे (सध्य पाकिस्तानात असलेल्या) केली होती. ही कंपनी सुरुवातीला खेळांच्या साधनांची निर्मिती करीत असे. पण स्वातंत्र्यानंतर त्यांनी यूपी (मेरठ) मध्ये कंपनीची पुनर्बांधणी केली.
दोन्ही भावांना क्रिकेटमध्ये रस असल्याने त्यांनी क्रिकेटची सााधने बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. गावस्करांसारख्या खेळाडूंनी त्यांची उत्पादने वापरण्यास सुरुवात केली. १९९१ मध्ये बीसीसीआयने एसजीला मान्यता दिली. त्यानंतर भारतातील कसोटी सामन्यांमध्ये एसजी चेंडू वापरले जातात.
हे चेंडू हाताने तयार करण्यात येतात आणि सरळ शिवण असल्याने हा चेंडू एक दिवसानंतरही चांगल्या स्थितीत राहतो. भारतातील कोरड्या खेळपट्ट्यांमुळे त्यांच्यावरील चमक फार लवकर निघून जाते. हे चेंडू फिरकीपटूंना सर्वाधिक मदत करतात. चमक गेल्यानंतर गोलंदाजांना या चेंडूने रिव्हर्स स्विंग मिळतो.
ट्रेंडिंग घडामोडी –
माजी गोलंदाज म्हणतोय, माझं आणि पीटरसनचं अजिबात नव्हतं जमतं