भारतीय अंडर-19 संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 4 जानेवारीला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार विजय मिळवला. आता 5 जानेवारीला होणारा दुसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
सामना 5 जानेवारी सोमवार रोजी विल्मूर पार्क, बेनोनी येथे खेळला जाणार असून चाहते हा सामना ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका’ (Cricket South Africa) च्या अधिकृत यूट्यूब (YouTube) चॅनेलवर विनामूल्य पाहू शकतात. तसेच तांत्रिक कारणांमुळे हॉटस्टारवर याचे प्रक्षेपण होऊ शकले नाही, त्यामुळे यूट्यूब हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 301 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) स्वस्तात बाद झाला असला, तरी हरवंश पंगालियाने 95 चेंडूंत 93 धावांची दमदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 27.4 षटकांत 4 बाद 148 धावा केल्या होत्या, पण पावसामुळे खेळ थांबला आणि भारताला 25 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघ:
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंह (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंह, उधव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार.






