यावर्षी भारतीय संघाने पाचव्यांदा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत संघाला यश मिळवून दिले. हा विजय सहजासहजी मिळाला नाही, यासाठी खळाडूंना मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. असे वाटले होते की, भारतीय संघ ही स्पर्धा पूर्णपणे खेळू शकणार नाही. पहिलाच सामना झाल्यानंतर संघातील अनेक खेळाडूंच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या. त्यामुळे संघात फक्त १० खेळाडू चांगले राहिले होते. अशा परिस्थितीतही युवा खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला.
एका वृत्तसंस्थेला भारतीय १९ वर्षाखालील संघातील खेळाडूंनी मुलाखत दिली आहे आणि त्यांच्या प्रवासावर आणि स्पर्धेदरम्यान आलेल्या कोरोना संकटाबद्दल सांगितले आहे.
रवी कुमार
या स्पर्धेतील कोरोना स्थिती सांगताना रवी कुमार म्हणाला, “विश्वचषकादरम्यान लोकांनी मागे जी कामगिरी केली, ती जबरदस्त होती. आमच्यापैकी कोणालाही कसलीच तक्रार नव्हती. आमच्या व्यवस्थापकाला ही कोरोना झाला होता. तो दुसऱ्या शहरात होता, पण तो फोनवरून काम करून घेत होते. आमच्या फिजिओला डॉक्टर बनवण्यात आले. तसेच आमचे व्हिडिओ विश्लेषक व्यवस्थापक झाले होते. आमच्यापैकी फक्त १० जण आयर्लंडविरुद्ध खेळण्यासाठी फिट होते. अडचणी एवढ्या वाढल्या की दुखापत झालेल्या ११व्या खेळाडूला या सामन्यात खेळावे लागले. या काळात बीसीसीआयने उचललेली पावले उल्लेखनीय होती.”
यश धुल
कर्णधार यश धुल १९ जानेवारीला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात कोरोनामुळे खेळू शकला नाही, कारण तेव्हा त्याच्यासोबत संघातीधील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. उपकर्णधार शेख रशीद, आराध्य यादव, मानव पारेख, सिद्धार्थ यादव हे आयर्लंड आणि युगांडाविरुद्धच्या सामन्यातून बाहेर गेले.
निशांत सिंधू
निशांत सिंधूने याबाबत सांगितले की, “मी माझ्या हाताला टेप लावत होतो, तेव्हा दिनेश बाना धावत माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला की आज कर्णधार तुला केलं आहे. मला वाटले की तो मस्करी करत असावा. पण जेव्हा मी लॉबीत गेलो तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण सर आणि हृषिकेश कानिटकर सर म्हणाले की धुल आणि रशीद या दोघांच्या चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तू कर्णधार असणार आहे.”
शेख रशीद
संघाचा उपकर्णधार शेख रशीद त्याचे प्रशिक्षक कृष्ण राव यांच्याशी बोलताना म्हणाला, सर मला वाटतं माझा विश्वचषकातील प्रवास इथेच संपला आहे. मी आता कोरोनापासून बरा होऊ शकणार नाही. त्यांची भीती दूर करण्यासाठी राव यांनी त्याला त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली. त्यानंतर राशिदने तयार झाला आणि उपांत्य फेरीत ९४ आणि अंतिम फेरीत ५० धावा केल्या.
राजवर्धन हंगरगेकर
१९ वर्षाखालील विश्वचषकामध्ये गोलदाजी आणि फलंदाजीत ही शानदार कामगिरी केलेला अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर याने जून २०२० मध्ये कोरोनामुळे त्याने वडील गमावले. जेव्हा हंगरगेकरला याबाबत विचारल गेलं तेव्हा तो म्हणाला की, “माझ्यासाठी आता एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे वेगवान गोलंदाजी आणि षटकार मारणे.”
अंगक्रिश रघुवंशी
दिल्लीमध्ये जन्मलेला अंगक्रीश रघुवंशी हा संघातील सर्वात तरुण खेळाडू होता. वयाच्या ११ व्या वर्षी तो गुडगाव सोडून मुंबईमध्ये आला. त्यांचा भाऊ कृष्णा याला लहानपणी कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याने आजारी होता. अंगक्रिशच्या आईने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “अंगक्रिश आमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये झोपायचा. ती ५ वर्षे सर्वात भयंकर होती, कृष्णावर उपचार करण्याच्या प्रक्रियेने त्याला मानसिकदृष्ट्या कठीण बनवले.”
राज बावा
या स्पर्धेत शानदार कामगिरी करणारा राज बावा खुप कष्ट करून इथपर्यंत पोहचला आहे. बावाच्या वडिलांना म्हणजेच सुखविंदर बावा यांना त्याने गोलंदाजी करावी असे वाटत नव्हते. त्याचे वडील म्हणाले त्यांनी गोलंदाजी कारणे चालू ठेवले आणि १६ वर्षाखालील संघातील सहकाऱ्यांनी हे प्रशिक्षकांना न सांगण्यास सांगितले.
विकी ओस्तवाल
या विश्वचषक स्पर्धेत १२ बळी घेऊन संघाला सर्वात यशस्वी बनवणारा गोलंदाज म्हणजे विकी ओस्तवाल. त्यालासुद्धा इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. विकी वयाच्या ९ व्या वर्षी वडिलांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी दररोज लोणावळ्यावरून मुंबईला जायचा. त्याचे प्रशिक्षक मोहन जाधव यांनी सांगितले की, “मी त्याला कधी उशिरा येताना तर कधी लवकर येताना पाहिले होते. एकदा मी ते कुठे राहतात विचारले तेव्हा विकी म्हणाला की तो लोणावळ्याहून रोज मुंबईला येतो. मला हे ऐकून धक्काच बसला.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’
दुसऱ्या वनडे सामन्यात ‘हा’ फलंदाज करू शकतो रोहित सोबत डावाची सुरुवात, सूर्यकुमारचा खुलासा
जेसन रॉयवर मेगा लिलावात बरसणार पैसा; पीएसएलमध्ये आणले वादळ