पुणे, 17 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत नियोजनबद्ध खेळ करणाऱ्या यू मुंबा संघाने तमिळ थलायवाजला संघाचा 46-33 असा धुव्वा उडवताना तिसऱ्या विजयाची नोंद केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत गुमान सिंग आणि आमीर मोहम्मद जाफर दानिश या दोघांनीच 21 गुणांची कमाई करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. तत्पूर्वी दोन्ही संघानी सलामीला यशस्वी चढाया केल्या. परंतु गुमान सिंगच्या सुपर रेड मुळे आघाडी घेणाऱ्या यू मुंबा संघाने पूर्वार्धातच 11 गुणांची आघाडी मिळवताना तमिळ थलायवाजलावर वर्चस्व गाजवले.
गुमान सिंगने 9 चढाईत मिळवलेले 11 गुण आणि जाफर दानिशने त्याला दिलेली साथ यामुळे पूर्वार्धातच पहिला लोन चढवाताना मिळवलेले वर्चस्व उत्तरार्धात तमिळ थलायवाजने काही प्रमाणात रोखले. तरीही यू मुंबा संघाच्या बचावपटूमुळे तमिळ थलायवाजला आपली पिछाडी भरून अखेरपर्यंत काढताच आली नाही याचवेळी जाफर दानिशने सुपर रेड करताना मुंबई ला40-24 अशा निर्णायक आघाडीवर नेले. यावेळी सामन्याची केवळ पाच मिनिटे बाकी होती. उरलेल्या वेळात तमिळ थलायवाजने आटोकाट प्रयत्न करूनही यू मुंबाच्या अप्रतिम बचावामुळे त्यांच्या चढाई पटुंचे प्रयत्न अपयशी ठरले. (U Mumba’s third win by defeating Tamil Thalaiwaj)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2023 । सचिनने मुंबई इंडियन्सची साथ सोडली? समोर आली महत्वाची माहिती
SA vs IND । ‘…तर आनंदच होईल’, कसोटी मालिकेपूर्वी केएल राहुलने व्यक्त केली इच्छा