आयपीएलच्या17 व्या हंगामातील 5 व्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या आहेत. मात्र या सामन्यात विचित्र प्रकार समोर आला आहे. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
याबरोबरच, नरेंद्र मोदी स्टेडियमवरती शेवटच्या षटकात हार्दिक पांड्या क्षेत्ररक्षण लावत असताना रोहित शर्माला पळवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधी चालु सामन्यात कुत्रा आल्याचं व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे. तसेच रोहित शर्मा 30 यार्डच्या आतही मैदानात उतरल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, परंतु या सामन्यात हार्दिकने त्याला सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी ज्या पद्धतीने पाठवले ते चाहत्यांना आवडले नाही. आता पुन्हा एकदा युजर्सनी हार्दिकला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
https://twitter.com/retiredMIfans/status/1771920923316089079
दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली असून त्याने 4 षटकात 14 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कोएत्झीने 2 आणि पियुष चावलाला 1विकेट्स मिळाली आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11- हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह ,ल्यूक वुड.
गुजरात टायटन्स प्लेइंग 11- शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन.
महत्त्वाच्या बातम्या-