---Advertisement---

‘या’ कारणाने रद्द करण्यात आला आशिया चषकातील महत्त्वपूर्ण सामना; क्षणात बदलली उपांत्य फेरीची समीकरणे

On: बुधवार, डिसेंबर 29, 2021 5:25 PM
ban u19
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh U-19 vs Srilanka U-19) यांच्यात १९ वर्षाखालील आशिया कपमध्ये (U-19 Asia Cup) खेळवला जाणारा सामना २ अधिकाऱ्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने रद्द करण्यात आला. त्यामुळे आता उपांत्य फेरीत भारत बांगलादेशशी भिडणार आहे. याआधी सांगण्यात येत होते की, भारताची उपांत्य फेरीत पाकिस्तानशी लढत होऊ शकते. मात्र, आता तसे होणार नाही. गट ब च्या या सामन्यात ३२.४ षटकांचा खेळ झाला होता आणि मग त्या अधिकाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने सामना थेट रद्द करण्यात आला.

२ अधिकारी आले कोव्हिड पॉझिटीव्ह
आशियाई क्रिकेट परिषद (Asian Cricket Council) (एसीसी) (ACC) यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘आशियाई क्रिकेट परिषद एमिरेट्स क्रिकेट बोर्डला (Emirates Cricket Board) सांगू इच्छिते की १९ वर्षाखालील आशिया कपमध्ये खेळवला जाणारा आजचा सामना रद्द करण्यात येत आहे. दोन अधिकाऱ्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सर्व अधिकारी आता सुरक्षित आहेेत. तसेच, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सामन्याशी निगडित सर्व अधिकाऱ्यांची चाचणी केली आहे आणि रिपोर्ट येईपर्यंत ते विलागीकरणात राहतील.

भारत या स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ
बांगलादेश आणि श्रीलंका उपांत्य फेरीत आधीच पोहचले होते. त्यामुळे या सामन्यातून गटातला विजेता आणि उपविजेता काढता येणार होता. चांगल्या रनरेटमुळे बांगलादेश गटात अव्वल स्थानी राहिला. त्यामुळे आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना भारताशी (India U-19) होईल. हा सामना ३० डिसेंबर रोजी खेळवण्यात येईल. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंका पाकिस्तानशी (Pakistan U-19) भिडणार आहे. भारत या स्पर्धेतील सर्वात सगळ्याा यशस्वी संघ आहे. भारताने ६ वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. भारत २०१६ मध्ये उपविजेता ठरला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला १९ वर्षाखालील मुलांचा विश्वचषक वेस्ट इंडिज येथे खेळलाा जाईल.

 

ज्या खेळाडूमुळे कोहली-कुंबळेमध्ये झाला होता वाद, रोहितच्या कॅप्टन्सीखाली त्याचीच होणार संघात एन्ट्री! (mahasports.in)

Video: टीम इंडियाच्या कामगिरीवर कॅप्टन कोहली भलताच खुश, आनंदाने मैदानावरच धरला ठेका (mahasports.in)

अभिमानास्पद! प्रशिक्षक द्रविडने निभावली परंपरा, ‘या’ खास पद्धतीने सुरू केला चौथ्या दिवसाचा खेळ (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---