---Advertisement---

कोणालाही आवडणार नाही असा विक्रम झाला युवा टीम इंडियाच्या नावावर

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2020 9:21 PM
---Advertisement---

रविवारी (9 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेत(South Africa) झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या(U-19 World cup) अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने भारताला पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाने 47.2 षटकात सर्वबाद 177 धावा केल्या होत्या आणि बांगलादेशला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते.

पण बांगलादेशला 15 धावांची गरज असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांच्यासमोर 46 षटकात 170 धावा करण्याचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान बांगलादेशने 42.1 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

या सामन्यादरम्यान भारतीय संघाने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेश विरुद्ध तब्बल अतिरिक्त 33 धावा दिल्या आहेत. ज्यामुळे 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात देण्यात आलेल्या सर्वाधिक अतिरिक्त धावांची बरोबरी झाली आहे.

यापुर्वी 1998मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध अतिरिक्त 33 धावा दिल्या होत्या.

त्यापाठोपाठ 2004 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने विंडीज संघाविरुद्ध अतिरिक्त 31 धावा दिल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---