भारतीय संघ 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचला आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी 11 फेब्रुवारीला विजेतेपदासाठी भिडणार आहे. भारत आपले सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम सुरु झाला आहे. अगदी पॅट कमिन्सनेही वनडे वर्ल्डकपआधी असंच काहीसं बोलला होता.
याबरोबरच, 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. तर उपांत्य फेरीत नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी स्वीकारली होती. तसेच फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला 48.5 षटकात 179 धावांवर रोखलं होतं. तर विजयासाठी दिलेल्या 180 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दम देखील निघाला होता.
पण शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून आता ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. यापू्र्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन वेळा अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळेस भारताने विजय मिळवला आहे. पण यावेळी ऑस्ट्रेलियाचा अंदाज काही वेगळा दिसत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वेबगेनने बरंच काही सांगून देखील गेला आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना एक क्षण गमवाल असं वाटत होतं. या प्रश्नावर ह्यू वेबगेन म्हणाला की,”काहीच शंका नव्हती, काम पूर्ण करण्यासाठी विड्स आणि राफवर पूर्ण विश्वास होता.” एकंदरीत सामन्याबाबत काय वाटतं या प्रश्नावरही त्याने उत्तर दिलं. “अँडरसनला बाहेर बसवण्याचा निर्णय खरंच कठीण होता, परंतु टॉम स्ट्रेकरने जबरदस्त गोलंदाजी केली. 17 वर्षीय पीकने मधल्या फळीत जबरदस्त फलंदाजी करत डाव पुढे सरकवला.”,असं ह्यू वेबगेन म्हंटले आहे.
दरम्यान, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. यासाठी कशी तयारी असेल? असा प्रश्न विचारताच वेबगेनने आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. “भारत एक चांगला संघ आहे. आम्हाला ते आव्हान पेलायला आवडेल.” , असं बोलून ह्यू वेबगेनने पॅट कमिन्स वक्तव्याची आठवण करून दिली. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पॅट कमिन्सने 1 लाख लोकांना एकावेळी गप्प करण्याचा आनंद वेगळा असल्याचं म्हंटलं होतं.
महत्वाच्या बातम्या –
L&T मुंबई ओपन डब्लूटीए स्पर्धेच्या एकेरीत भारताच्या ऋतुजा भोसलेचे आव्हान संपुष्टात