---Advertisement---

U19 CWC: अमेरिकेचा अर्धा संघ तंबूत पाठवणारा हेनिल पटेल नक्की कोण?

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 10:37 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूषांच्या 19 वर्षाखालील वनडे विश्वचषकाला 15 जानेवारीपासून सुरूवात झाली. या स्पर्धेतील पहिलाच सामना भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात बुलवायोच्या क्विन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने या स्पर्धेची विजयी सुरूवात केली आहे. पहिलाच सामना भारतीय फलंदाज नाहीतर गोलंदाजांनी चांगलाच गाजवला. त्यातील हेनिल पटेलने तर अमेरिकेच्या अर्ध्या संघाला बाद करत त्यांची फलंदाजी पूर्णपणे उध्वस्त केली.

हेनिलच्या भेदक माऱ्यासमोर अमेरिकेचा एकही फलंदाज अधिक काळ टिकला नाही. ज्यामुळे अमेरिकेचा संघ 35.2 षटकात 107 धावसंख्येवरच सर्वबाद झाला. त्याने 7 षटकात 16 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. ज्यामधील एक षटक निर्धाव होते. त्याला बाकी गोलंदाजांकडूनही उत्तम साथ मिळाली. त्याचबरोबर त्यानेच अमेरिकेच्या फलंदाजीला पहिला सुुरूंग लावला. अमरिंदर गिल एक धाव करत बाद झाला. त्याने नंतर एकाच षटकात कर्णधार उत्कर्ष श्रीवास्तव (0) आणि विकेटकीपर अर्जुन महेश (16) यांच्या विकेट्स घेतल्या.

विश्वचषकाची भन्नाट सुरूवात करणाऱ्या हेनिलचा जन्म गुजरातच्या वलसाड येथे 28 फेब्रुवारी 2007ला झाला. सुरूवातीला त्याने वडिलांकडून क्रिकेटचे धडे गिरवले. त्याचा खेळ पाहता त्याच्या वडिलांनी त्याला वडोदऱ्याच्या संग्रामसिंग गायकवाड स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर त्याने मोहालीच्या मोंगियो स्कुल ऑफ क्रिकेट एक्सलंसमध्ये त्याच्या गोलंदाजीवर अधिक काम केले. तसेच तो 2024-25 विनू मंकड हंगामात गुजरातकडून खेळला. ज्यामध्ये संघाने विजय मिळवला.

हेनिलने 19 वर्षाखालील आणि 23 वर्षाखालील गुजरात संघांकडून खेळताना कामगिरीत सातत्य ठेवले. ज्यामुळे जून 2025मध्ये त्याची इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत 19 वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली.

18 वर्षीय हेनिलने 3 युथ कसोटी आणि 12 युथ वनडे खेळले असून त्यात एकूण 28 विकेट्स घेतले. नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धादेखील तो खेळला असून यामध्ये त्याने 4 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच अमेरिकेविरुद्धचा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. यामध्ये भारताकडून सर्वाधिक धावा विकेटीकिपर अभिज्ञान कुंडू याने केल्या. तो 41 चेंडूत 42 धावा करत नाबाद राहिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---