U19 IND vs AUS Final : आज अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अंडर 19 महाअंतिम सामन्यात महाराष्ट्रातील खेडमधील असलेली व्यक्ती अंपायर आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तो नक्की कोण आहे?
अंडर 19 महाअंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मराठमोळ्या माणासकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर या सामन्यात अल्लाहुद्दीन पालेकर हे महाराष्ट्राच्या खेडमधील असून ते पंचाच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत. याबरोबरच, अल्लाद्दीन पालेकर हे मुळचे महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे आहेत.
अल्लाहुद्दीन पालेकर हे खेडमधील शिव या गावातील आहेत. तसेच अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडील हे नोकरीनिमित्ताने दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले होते. त्यानंतर अल्लाउद्दीन यांचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेतील मात्र त्यांची आपल्या गावासोबतची नाळ अजूनही कायम आहे.
दरम्यान, महाअंतिम सामना हा सामना विलोमोरी पार्क बेनोनी येथे खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान असणार आहे.
अंतिम सामन्यासठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ :-
भारतीय संघ :- आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया संघ :- ऑस्ट्रेलिया: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), ऑलिव्हर पीक, चार्ली अँडरसन, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर.
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने विराटवर केला गंभीर आरोप; म्हणाला, ‘कोहलीने माझ्यावर…
Ranji Trophy : क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ! म्हणाले, ‘BCCI ने रणजी ट्रॉफी बंद केली पाहिजे…