भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (u19 team india) यावर्षी पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारताचा मुख्य संघ संध्या वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका (ind vs wi odi series) खेळत आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. उभय संघातील या दुसऱ्या सामन्यादरम्यान विश्वचषकविजेता १९ वर्षाखालील भारतीय संघाही मैदानात उपस्थित राहिला. इथे गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून या युवा खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवा संघातील खेळाडूंची मुख्य संघातील दिग्गजांशी भेट होऊ शकली नाही.
आधी असे ठरवले गेले होते की, १९ वर्षाखालील संघाचे खेळाडू अहमदाबादमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि संघातील इतर दिग्गजांशी भेटतील. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तयार केलेल्या कडक नियमावलीमुळे युवा खेळाडूंची ही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही.
दरम्यान, वेस्ट इंडीविरुद्धची ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. याच कारणास्तव बायो बबलचे कडक पालन केले जात आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून मिळणाऱ्या या सन्मानापूर्वी बीसीसीआयनेही या खेळाडूंसाठी मोठे बक्षीस जाहीर केले आहे. विश्वचषक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयकडून ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, तर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार आहेत.
The BCCI Office Bearers – Honorary Secretary @JayShah and Honorary Treasurer @ThakurArunS – and #U19CWC-winning #BoysInBlue at the Narendra Modi Stadium, Ahmedabad.#TeamIndia | #INDvWI pic.twitter.com/LVHLdaGo9F
— BCCI (@BCCI) February 9, 2022
Our #U19CWC-winning team in attendance here in Ahmedabad 🏟️#BoysInBlue pic.twitter.com/L0KheIUD4M
— BCCI (@BCCI) February 9, 2022
दरम्यान, १९ वर्षाखालील विश्वचषकातील भारतीय संघाच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते अप्रतिम राहिले. भारतीय संघाने स्पर्धेतील एकाही सामन्यात पराभव पत्करला नाही. ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये संघाने दक्षिण अफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा या संघांना मात दिली. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात मागच्या गतविजेता संघ बांगलादेशला पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ होता. भारताने ऑस्ट्रेलियालाही मात दिली. त्यानंतर अंतिम सामन्यात इंग्लंडवर चार विकेट्स राखून विजय मिळवला आणि इतिहासातील पाचवा विश्वचषक जिंकला.
भारत १९ वर्षाखालील विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यापाठोपाठ नंबर लागतो तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या इतिहासात तीन वेळा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. भारत आतापर्यंत आठ वेळा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. तर मागच्या चार वर्षांमध्ये एकदाही असे झाले नाही, जेव्हा भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला नसेल.
महत्वाच्या बातम्या –
भारतात विराटचा मोठा विश्वविक्रम; मास्टर-ब्लास्टर सचिनही पडला जवळपास ८०० धावांनी मागे
वेस्ट इंडिजच्या स्मिथचा भारताला दुहेरी धक्का, एकाच षटकात २ मोठ्या फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता