U19 WC Final : सिनिअर मेन्सनंतर वर्ल्ड कपनंतर आता अंडर 19 ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचं स्वप्न भंग केलं आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 79 धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये टीम इंडियाला विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचं 43.5 ओव्हरमध्ये 174 धावांवर पॅकअप झालं. तर ऑस्ट्रेलियाने याविजयासह 2010 नंतर पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. तर टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाचा षटकार मारण्यात अपयशी ठरली आहे.
याबरोबरच, अंडर 19 संघाचा भारतीय कर्णधार उदय सहारन याने पराभवावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, संपूर्ण विश्वचषकादरम्यान आमच्या सर्व खेळांडूनी चांगला खेळ केला. अंतिम सामन्यासाठी आमची तयारीही चांगली झाली होती. पण आज आम्ही खेळपट्टीवर अधिक काळ थांबू शकलो नाहीत. जी तयारी केली होती, त्याप्रमाणे खेळ सादर करण्यात आम्ही कमी पडलो आहे.
तसेच पुढे बोलताना उदय सहारन पुढे म्हणाला की, या स्पर्धेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आमच्या सपोर्ट स्टाफनेही आम्हाला खूप सहकार्य केलं. या स्पर्धेतून धडा घेऊन आम्ही नक्की पुढे जाऊ. याबरोबरच, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्षभरात सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून रोखलंय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभवाची धुळ चारली. त्यानंतर आता अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ ठरली आहे.
अंतिम सामन्यात भारताचा संघ ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. यामुळे भारतीय संघाचा ४३.५ षटकांत अवघ्या १७४ धावांपर्यंत भारतीय संघाच्या फलंदाजांना मजल मारता आली. याबरोबरच, भारतीय संघाकडून सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (४२) या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाना तोंड दिले. परंतु या दोघांव्यतिरिक्त इतर कुठल्याच फलंदाजाला म्हणाव अशा खेळी करता आल्या नाहीत.
दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय धिम्या गतीने केली. तिसऱ्याच षटकात भारताचा सलामीचा फलंदाज अर्शीन कुलकर्णी केवळ ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर २५ षटकात भारताने ९१ धावांवर ६ गडी गमावले होते. सलामीवीर आदर्श सिंह व्यतिरिक्त एकही खेळाडू खेळपट्टीवर टीकू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
U19 WC Final । भारताचा बदला अपुराच! अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून यंग इंडियाही पराभूत
पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टेडियम साठी सहकार्य करणार’ – राज ठाकरे