आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील वनडे विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन घोषित केली. या संघात भारताच्या एक-दोन नाही तर एकूण चार खेळाडूंना स्थान दिले गेले आहे. भारतीय 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार उदय सहारन आणि धडाकेबाज फलंदाज मुशीर खान यांनी विश्वचषक हंगामात केलेल्या प्रदर्शनामुळे त्यांना या संघात संधी दिली गेली आहे. त्याचसोबत बीड जिल्ह्यातील सचिन धस आणि फिरकीपटू सौम्य पांडे यांनाही संघात निवडले गेले आहे.
यावर्षी खेळला गेलेला 19 वर्षांखालील विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला गेला. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तुल्यबळ संघ आमने सामने होते. उभय संघांतील हा सामना घासून होईल, असे सर्वांना वाटत होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारतावर एकतर्फी विजय मिळवला. भारताला 79 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकवून देणारा त्यांचा कर्णधार ह्यू बिवगेन याला आयसीसीच्या 19 वर्षांखालील संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हा संघ मीडिया पार्टनर्स, प्रसारक आणि आयसीसी अधिकाऱ्यांनी एकत्र बसून निवडला आहे. यात भारताच्या चार खेळाडूंना निवडण्यात आले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना संघात स्थान मिळवले आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना, तर वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघाचा प्रत्येकी एक-एक खेळाडू या संघात आहेत.
स्कॉटलँडच्या जेमी डंक याला 12व्या खेळाडूंच्या रुपात संघात स्थान दिले गेले आहे. भारतीय संघाने या सामन्यात उपांत्य सामन्यापर्यंत एकही पराभव स्वीकारला नाव्हता. पण अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून मात मिळाली. मागच्या एका वर्षाच्या काळात ऑस्ट्रेलियाकडून प्रमुख स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा हा तिसरा पराभव ठरला. मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने होते. मागच्याच वर्षी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना देखील भारत आमि ऑस्ट्रेलिया यांच्यातच खेळला गेला होता. विश्वचषक आणि डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने भारतालाच पराभूत करू जिंकला.
टीम ऑफ द टुर्नामेंट –
लुआन ड्रे प्रीटोरियस (यष्टीरक्षक, दक्षिण आफ्रिका), हॅरी डिक्सन (ऑस्ट्रेलिया), मुशीर खान (भारत), ह्यू विबगेन (ऑस्ट्रेलिया), उदय सहारन (भारत), सचिन धस (भारत), नाथन एडवर्ड (वेस्ट इंडीज), कॅलम विडलर (ऑस्ट्रेलिया), उबॅद शाह (पाकिस्तान), क्लेना मफाका (दक्षिण आफ्रिका), सौम्य पांडे (भारत), जेमी डंक (स्कॉटलँड/संघातील 12 वा खेळाडू)
(U19 WC Team of the Tournament announced, not one or two but four Indians make it)
महत्वाच्या बातम्या –
‘त्या घटनने माझ्या कुटुंबावर परिणाम झाला…’, पाचव्या शतकानंतर मॅक्सवेलकडून वाईट अनुभवाचा उल्लेख
AUS vs WI : ऑस्ट्रेलियाच्या संघात तिसऱ्या T20I साठी ‘या’ स्फोटक फलंदाजाचा समावेश; घ्या जाणून कोण आहे तो…