दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील आयसीसी विश्वचषक सुरू आहे. भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका संघावारी बुधवारी (6 फेब्रुवारी) या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना रंगला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 244 धावांपर्यंत मजल मारली.
उभय संघातील या उपांत्या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेसाठी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर लुआन-ड्रे प्रेटोरियस याने 76 धावांची सर्वोत्तम खेळी केली. रिचर्ड सेलेट्सवेन यानेही 64 धावांचे योगदान दिले. पण संघातील इतर एकही खेळाडू अर्धशतक करू शकला नाही. भारतासाठी राज लिंबानी याने 9 षटकात 60 धावा खर्च करून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मुशीर खान याने 10 षटकात 43 धावा दिल्या आणि दोन खेळाडूंना तंबूत धाडले. नमन तिवारी आणि सौम्य पांडे यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
Innings Break!
South Africa U19 post 244/7 in the first innings.
Raj Limbani, the pick of the #TeamIndia bowlers with figures of 3/60 👌👌
Over to our batters 🙌
Scorecard ▶️ https://t.co/Ay8YmV8iNI#BoysInBlue | #U19WorldCup | #INDvSA pic.twitter.com/APCOViKai5
— BCCI (@BCCI) February 6, 2024
(U19 World Cup 2024 IND vd ENG South Africa U19 post 244/7 in the first innings.)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
19 वर्षांखालील भारतीय संघ: आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, उदय सहारन (कर्णधार), सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे.
दक्षिण आफ्रिका अंडर-19: लुआन-ड्रे प्रिटोरियस (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, जुआन जेम्स (कर्णधार), ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना, क्वेना माफाका.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । बॅझबॉलच्या नादात जो रुट स्वतःचा खेळ विसरतोय? माजी कर्णधाराचा दावा
क्रिकेटजगतात सुरू झाला नवा वाद, रोहितकडून कर्णधारपद काढून घेणं चुकीचं! पत्नी रितिकाची पहिली प्रतिक्रिया