अँटिग्वा| शनिवारी (५ फेब्रुवारी) युवा भारतीय संघाने यश धूलच्या नेतृत्त्वाखाली १९ वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव करत भारताने पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वविजेते होण्याचा मान पटकावला. त्यामुळे ५ वेळा हा विश्वचषक जिंकणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे. तसेच यश धूल हा भारताचा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा पाचवा कर्णधार ठरला आहे.
या भारतीय कर्णधारांनी जिंकलाय १९ वर्षांखालील विश्वचषक
यश धूलच्या पूर्वी २००० साली भारताकडून सर्वात प्रथम मोहम्मद कैफने कर्णधार म्हणून १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २००८ साली विराट कोहली, २०१२ साली उन्मुक्त चंद आणि २०१८ साली पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. आता या यादीत यश धूलचाही समावेश झाला आहे.
2⃣0⃣0⃣0⃣ 🏆
2⃣0⃣0⃣8⃣ 🏆
2⃣0⃣1⃣2⃣ 🏆
2⃣0⃣1⃣8⃣ 🏆
2⃣0⃣2⃣2⃣ 🏆India U19 – The FIVE-TIME World Cup Winners 👏 🔝#U19CWC #BoysInBlue pic.twitter.com/DiE53Sdu0Y
— BCCI (@BCCI) February 5, 2022
असा झाला सामना
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणे पसंत केले होते. पण, त्यांची सुरुवात खराब राहिली. इंग्लंडने ९१ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. पण जेम्स ऱ्यू यांने एकाकी झुंज देताना ९५ धावांची खेळी केली. तसेच तळात जेम्स सेल्सने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने ४४.५ षटकात सर्वबाद १८९ धावा केल्या.
त्यानंतर १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात संघर्षपूर्ण राहिली. मात्र, उपकर्णधार शेख राशिद आणि निशांत संधू यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ४८ व्या षटकात १९५ धावा करत विजय मिळवला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.
१९ वर्षांखालील विश्वविजेते भारतीय कर्णधार
२००० – मोहम्मद कैफ
२००८ – विराट कोहली
२०१२ – उन्मुक्त चंद
२०१८ – पृथ्वी शॉ
२०२२ – यश धूल
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय दिग्गजाने बनविली ऑल-टाईम U19 टीम; भारताच्या केवळ एका खेळाडूचा समावेश
मिताली राजने सांगितली आवडत्या चार क्रिकेटपटूंची नावे; एक भारताचा उगवता तारा
निवड समितीच्या बैठकीत सहभागी असल्याच्या आरोपावर अखेर गांगुलींनी सोडले मौन