ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकासाठी एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. यातील सहभागी होणारे १२ संघ यापूर्वीच निश्चित झाले होते. मात्र, ४ संघ पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार होते. त्यानुसार मंगळवारी (२२ फेब्रुवारी) संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि आयर्लंड यांनी टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे आता टी२० विश्वचषक २०२२ साठी पात्र ठरलेल्या एकूण संघांची संख्या १४ अशी झाली आहे.
ओमानमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक क्वालिफायर अ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युएई आणि आयर्लंड या दोन्ही संघानी स्थान मिळवले असल्याने हे दोन्ही संघ टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले. युएईने उपांत्य फेरीत नेपाळला ६८ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर आयर्लंडने ओमानला ५६ धावांनी पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
युएई २०१४ नंतर पहिल्यांदाच टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तसेच आयर्लंड सातव्यांदा टी२० विश्वचषकात खेळणार आहे. आता टी२० विश्वचषकासाठी उर्वरित २ संघ जुलैमध्ये होणाऱ्या क्वालिफायर २ स्पर्धेतून पात्र ठरतील.
The emotion. This is what it means.
The moment UAE qualified for their first ICC Men's T20 World Cup since 2014 ????#T20WorldCup pic.twitter.com/UT4mLxzl7m
— T20 World Cup (@T20WorldCup) February 23, 2022
Australia calling ????
Ireland and UAE have booked their spot in the ICC Men's #T20WorldCup 2022 ????
➡️ https://t.co/kzdCgsj3bD pic.twitter.com/Trdi6gtyn2
— T20 World Cup (@T20WorldCup) February 22, 2022
युएईने नेपाळला केले पराभूत
नेपाळ आणि युएई संघात उपांत्य फेरीचा पहिला सामना झाला. या सामन्यात युएईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७५ धावा केल्या. युएईकडून मोहम्मद वासिमने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज वृत्य अरविंदने ४६ धावांची खेळी केली. नेपाळकडून जितेंद्र मुखिया आणि अबिनाश बोहरा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ १८.४ षटकातच १०७ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे नेपाळच्या सलग ३ विजयाच्या रथाला युएईकडून लगाम लागला. युएईकडून अहमद रझाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
आयर्लंडकडून ओमान पराभूत
आयर्लंडने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ओमानला पराभूत करत अंतिम सामन्यातील तिकीट बूक केले. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १६५ धावा केल्या. त्यांच्याकडून गॅरेथ डेलनीने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय हॅरी टेक्टरने ३५ आणि अँडी मॅकब्राईनने ३६ धावांचे योगदान दिले. तसेच ओमानकडून बिलाल खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
ओमानला १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १८.३ षटकात सर्वबाद १०९ धावाच करता आल्या. त्यामुळे ओमान संघ पराभूत झाला. ओमानकडून शोएब खानने ३० आणि कर्णधार झिशन मकसूदने २८ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त अन्य कोणाला खास काही करता आले नाही. आयर्लंडकडून सिमी सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी
…आणि सर्वात मोठ्या रनचेजमध्ये अर्धवट नशेत गिब्जने केली वादळी खेळी






