---Advertisement---

पाकिस्तानी वंशाच्या ‘या’ यष्टीरक्षकावर आयसीसीची मोठी कारवाई, घातली ४ वर्षांची बंदी

On: मंगळवार, सप्टेंबर 7, 2021 5:30 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) यष्टीरक्षक फलंदाज आणि पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटपटू गुलाम शब्बीरवर सोमवारी (०६ सप्टेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शब्बीरने २०१९ मध्ये नेपाळ आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या ६ नियमांचे उल्लंघन केल्याचे कबूल केले होते.

आयसीसीच्या खेळ प्रशासकीय मंडळाने उघड केले की, शब्बीरने आचारसंहितेच्या नियम २.४.४, २.४.५, २.४.६ आणि २.४.७ चे उल्लंघन केले आहे. शब्बीरवरील बंदी २० ऑगस्ट २०२५ पर्यंत लागू राहील. पाकिस्तानी वंशाचा हा क्रिकेटपटू यूएईसाठी ४० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यामध्ये २३ एकदिवसीय आणि १७ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. शब्बीरने ४० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यष्टीमागे ४४ झेल घेतले आहेत, तर ३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला यूएईचा वेगवान गोलंदाज कादिर अहमदवर भ्रष्टाचारामुळे ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर माजी कर्णधार मोहम्मद नावेद आणि सलामीवीर शैमन अन्वर बटवर ८ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यूएई संघ यंदाच्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहे.

जानेवारी-फेब्रुवारी २०१९ मध्ये नेपाळविरुद्धच्या मालिकेदरम्यान भ्रष्टाचारात सामील झाल्यानंतर भ्रष्टाचार विरोधी युनीटला (एसीयू) संपर्क साधण्याच्या प्रयत्नांची माहिती देण्यात शब्बीर अपयशी ठरला. तसेच तो एप्रिल २०१९ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेदरम्यान भ्रष्टाचारात सहभागी झाल्याबद्दल एसीयूला संपर्क केल्याची संपूर्ण माहिती देण्यातही अपयशी ठरला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेच्या संदर्भात भ्रष्टाचाराबाबत आणखी एका सहकाऱ्याशी संपर्क साधला गेला होता की नाही? हेही त्याने उघड केले नाही. त्याने वस्तुस्थिती आणि घटना लपवल्या ज्याची त्याला जाणीव होती आणि जी इतर सहभागींच्या भ्रष्ट पद्धतींचा पुरावा होती.

त्यामुळे नियम २.४.६ अन्वये एसीयूच्या तपासाला सहकार्य करण्यात तो अपयशी ठरला. कारण त्याने विनंती केल्यावर आपले सर्व मोबाईल तपासासाठी सोपवले नाहीत. त्याचवेळी, त्याने एसीयूने मागितलेली कागदपत्रेही दिली नाहीत. त्यांनी तपासात उपयोगी पडलेली माहिती लपवून एसीयूच्या तपासात अडथळा आणला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फिरकीपटू अन् यष्टीरक्षकांच्या निवडीवर सर्वांच्या नजरा, टी२० विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूंची भारतीय संघात वर्णी?

शंभर सामने उलटले, पण शैली तीच!! बुमराहची पहिली अन् शंभरावी विकेट, बघा खास व्हिडिओ

“जितक्या उचक्या अश्विनला या मालिकेत लागल्या असतील तितक्या संपूर्ण आयुष्यात देखील लागल्या नसतील”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---