प्रत्येक युवा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचे स्वप्न पाहतो. जर हे स्वप्न पूर्ण झाले तर तो/ती युवा खेळाडू आपले पदार्पण संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतो. आयसीसी अंडर19 टी20 विश्वचषकात पदार्पण करून इतिहास रचणाऱ्या भारताची युवा गोलंदाज वैष्णवी शर्मासोबतही असेच काहीसे घडले आहे. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात 19 वर्षीय वैष्णवी शर्माला टीम इंडियाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत, वैष्णवी शर्माने तिच्या पदार्पणाच्या सामन्यातच हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली आहे.
वैष्णवीने आपल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. परिणामी संपूर्ण मलेशियन संघ 14.3 षटकांत फक्त 31 धावांवर ऑलआउट झाला. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने केवळ 2.5 षटकांत 32 धावांचे लक्ष्य गाठले. या विजयासह भारताने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
Vaishnavi Sharma becomes the first Indian woman to take a hat-trick in U-19 World Cup history 🇮🇳#Cricket #India #U19 #WorldCup pic.twitter.com/jQmla9gfIV
— Sportskeeda (@Sportskeeda) January 21, 2025
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने मलेशियन फलंदाजांना क्रीजवर टिकून राहण्याची संधी दिली नाही. मलेशियाच्या 11 पैकी चार फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. उर्वरित 7 फलंदाजही एकेरी धावा करून बाद झाले. 5 धावा हा संघाच्या फलंदाजाचा सर्वोत्तम स्कोअर होता. मलेशियन सलामीवीर नूर आलिया हैरून आणि हुस्ना यांनी प्रत्येकी 5 धावा केल्या.
भारताकडून वैष्णवी शर्माने शानदार गोलंदाजी केली. तिने 4 षटकांत फक्त 5 धावा देऊन अर्ध्या संघाला बाद करण्याचा महान पराक्रम केला. यादरम्यान तिने एक मेडन ओव्हरही टाकला. वैष्णवी शर्माची ही गोलंदाजी कामगिरी आयसीसी अंडर 19 विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या एली अँडरसनच्या नावावर होता. 2023 च्या अंडर 19 विश्वचषकात अलीने वेस्ट इंडिजविरुद्ध 15 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
वैष्णवी शर्मा व्यतिरिक्त, आयुषी शुक्लाने 3 विकेट्स घेतल्या. भारताकडून फलंदाजी करताना, गोंगाडी त्रिशा आणि जी कमलिनी या सलामी जोडीने कोणताही बळी न गमावता 3 षटकांतच संघाला लक्ष्य गाठून दिले. गोंगाडी त्रिशाने 12 चेंडूत 5 चौकारांसह 27 धावांची तुफानी खेळी खेळली. दरम्यान, कमलिनी 4 धावा काढत नाबाद परतली.
India defeated Malaysia by 9 wickets to register their second consecutive win in the Women’s U-19 World Cup 2025. 🇮🇳🏆#Cricket #India #U19 #WorldCup pic.twitter.com/24bFBF1APF
— Sportskeeda (@Sportskeeda) January 21, 2025
हेही वाचा-
याला म्हणतात ‘गंभीर’ परिणाम, विराट कोहली 12 तर रोहित शर्मा 10 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार
गिल नाही तर हा खेळाडू टीम इंडियाचा भावी कर्णधार, माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया
IND VS ENG; मालिकेपूर्वी मोठी घोषणा, दिल्लीच्या या खेळाडूची उपकर्णधारपदी निवड