भुवनेश्वर, १३ जाने.: अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ चा महामुकाबाला आज झाला तो गुजरात जायंट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात. या अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सवर ३१-२६ असा ५ गुणांनी दणदणीत विजय साजरा करत कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर एकच जल्लोष साजरा केला. विजेत्या गुजरात जायंट्सला रु. एक करोड व चषक, उपविजेत्या चेन्नई क्विक गन्सला रु. पन्नास लाख व चषक तर तृतीय क्रमांकाच्या ओडिशा जगरनॉट्सला रु. तीस लाख व चषक देऊन गौरवण्यात आले.
आजच्या सामन्यामध्ये सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज झालेल्या अंतिम सामन्यात ३१-२६ असा ५ गुणांनी दणदणीत विजय साजरा केला. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व गुजरात जायंट्स ला आक्रमणा साठी आमंत्रित केले. शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सला २९-१० असे १९ गुणांची आघाडी घेत २० गुणांचे आव्हान दिले होते तर गुजरात जायंट्सनेला अजून ड्रीम रन्स वाढवण्याचे लक्ष होते. गुजरातच्या पहिल्या तुकडीतील तीनही खेळाडू सव्वा मिनिटात बाद करत धुव्वाधार आक्रमणाचे प्रदर्शन केले ६ गुण वसूल केले. दुसऱ्या तुकडीला एकूण ३.१८ मिनिटात बाद करत ६ गुण म्हणजे एकूण १२ गुण मिळवत जोरदार मुसंडी मारत चेन्नई क्विक गन्सने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तिसऱ्या तुकडीतील दोन खेळाडू लवकर बाद झाले मात्र शेवटी संकेत कदमने नाबाद राहत विजयाला गवसणी घातली व त्याने ड्रीम रन्सचे २ गुण सुध्दा मिळवून दिले व गुजरातच्या पाठीराख्यांनी मैदानात एकच जल्लोष केला व हा सामना ३१-२६ असा जिकला.
तत्पूर्वी या सामन्यातील पहिल्या टर्न मध्ये या सामन्यातील पहिल्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सच्या धुव्वाधार आक्रमणानंतर चेन्नई क्विक गन्सच्या पहिल्या तुकडीतील रामजी कश्यपला पी. नरसय्याने, मदनला सुयश गरगटेने, विजय शिंदेला अक्षय भांगरेने सहज स्पर्शाने बाद केले व हि तुकडी अतिशय लवकार बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील आदित्य कुदळेला सुयश गरगटेने, लक्ष्मण गवस दोन वेळा डीएसआर वर नाबाद राहिला पण त्याला राजवर्धन पाटीलने सहज स्पर्शाने तर सुमोन बर्मनला फैजंखा पठाणने आकाशीय सूर मारत बाद केले व या तुकडीने एक ड्रीम रन मिळवला. या टर्न मध्ये गुजरातने चेन्नईवर १४-१ अशी १३ गुणांची आघाडी घेतली होती.
दुसऱ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सने जोरदार आक्रमण करत गुजरात जायंट्सच्या पहिल्या तुकडीतील शुभम थोरातला सचिन भार्गोने, दिपक माधवला सुरज लांडेने आकाशीय सूर मारत व सुयश गरगटेला दुर्वेश साळुंकेला सहज बाद केले व या तुकडीने ड्रीम रन्सचे ५ गुण मिळवून दिले. त्यानंतर दुसऱ्या तुकडीतील सर्व खेळाडू नाबाद राहिले व गुजरातने चेन्नई क्विक गन्सला एक एक गुण मिळवण्यासठी रडवल. मध्यंतराला गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सवर १९-७ अशी तब्बल १२ गुणांची आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सच्या आक्रमणानंतर चेन्नई क्विक गन्सच्या पहिल्या तुकडीने पहिल्या टर्न मध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळत जोरदार संरक्षण करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला पण त्यानंतर आदर्श मोहितेला शुभम थोरातने, अमित पाटीलला संकेत कदमने सहज स्पर्शाने तर आकाश कदमला संकेतनेच सूर मारत बाद केल व या तुकडीने एक ड्रीम रन मिळवून दिला. दुसऱ्या तुकडीतील मदनला संकेत कदमने व विजय शिंदेला पी. नरसय्याने लागोपाठ सूर मारून बाद केले. त्यानंतर रामजी कश्यपने दमदार संरक्षण करत नाबाद राहिला व ड्रीम रन्सचे २ गुण मिळवून दिले.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने तेलगु योध्दासचा ३२-२४ असा ८ गुणांनी दणदणीत पराभव केला व कांस्य पदकाला गवसनी घातली. या सामन्यात बी. निखीलला उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षक तर दिलीप खांडवीला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. खासदार सामन्याला पिनाकी मिश्रा यांनी खो-खो हा खूप चपळ खेळ असल्याचे सांगत हा वेगवान व बौध्दिक खेळ असल्याचे सांगितले. त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । ध्रुव जुरेलला टीम इंडियात संधी मिळाल्याने कुमार संगकारा खुश, वाचा काय आहे कनेक्शन
ईएमएमटीसी – एमएसएलटीए 14 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 120हून अधिक खेळाडू सहभागी