पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज उमर अकमल गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामुळे चर्चेत आला होता. मात्र, आता अकमलने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या भ्रष्टाचार प्रकरणात दिलेली शिक्षा पूर्ण केली आहे. पीसीबीने अकमलवर क्रिकेट खेळण्यासाठी एक वर्षाची बंदी आणि दंड ठोठावला होता. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्याने तो पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
भरला इतक्या लाखांचा दंड
पीसीबीने ठोठावलेला ४५ लाखांचा दंड भरल्यानंतर उमर अकमल याला बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुनर्वसन कार्यक्रमात भाग घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. पीसीबीच्या सूत्रांनी याची पुष्टी केली की, स्पोर्ट्स ट्रिब्यूनलने अकमलने दिलेला दंड पीसीबीकडे जमा झाला आहे. पीसीबी आणि अकमल यांनी दाखल केलेल्या खटल्यांमध्ये स्पोर्ट्स ट्रिब्यूनलने फेब्रुवारी महिन्यात अकमलला दंड ठोठावला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘उमर याने ४५ लाखांची संपूर्ण रक्कम बोर्डाकडे जमा केली आहे, म्हणजेच तो आता मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी युनिटच्या कार्यक्रमात भाग घेऊ शकतात. मात्र, क्रिकेट कारकिर्दीला पुन्हा सुरुवात करण्यासाठी त्याला आणखी थोडा काळ प्रतीक्षा करावी लागेल.’ यापूर्वी उमर अकमलने आपल्याकडे दंड भरण्यासाठी ४५ लाख रुपये नसल्याचे मंडळाला सांगितले होते. ही रक्कम हप्त्यांमध्ये भरण्यासाठी अकमल याने मंडळाला विनंती केलेली होती. परंतु, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उमर अकमल यांची विनंती फेटाळून लावलेली.
मागील वर्षी केली होती कारवाई
गेल्या वर्षी पाकिस्तान सुपर लीगमधील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात उमर अकमल दोषी आढळला होता. पीसीबीने यापूर्वी अकमलवर तीन वर्षे बंदी घातली होती. मात्र, उमर अकमलच्या अपीलवर पीसीबीने ही बंदी एक वर्षासाठी कमी केली. यष्टीरक्षक फलंदाज या नात्याने खेळणार्या उमरने आतापर्यंत पाकिस्तानसाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून २२१ सामने खेळले असून, यामध्ये ५ हजार पेक्षा जास्त धावा बनविल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या अजून एका खेळाडूने घेतली कोरोनाची लस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार
विराटनंतर भारताचा भावी कर्णधार कोण? पाकिस्तानी दिग्गजाने रोहितसह घेतली ‘यांची’ नावे
मोठा पेच! आयपीएल २०२१चे उर्वरित सामने ‘येथे’ झाल्यास टी२० विश्वचषकाचे आयोजन धोक्यात?