---Advertisement---

भारताच्या अजून एका खेळाडूने घेतली कोरोनाची लस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार

On: गुरूवार, मे 27, 2021 8:19 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा आणि सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने कोविड-19 ची पहिली लस घेतली आहे. या घटनेची माहिती त्यानी सोशल मिडियाद्वारे  लोकांना दिली. त्या दरम्यान त्याने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले. जे आपल्यासाठी भयानक कोरोना महामारी मध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांची मदत करत आहेत.

नटराजनने ट्विट करत असे लिहिले की, ‘आज सकाळी वैक्सिन दिल्याबद्दल खूप खूप आभार. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. जे स्वतःची पर्वा न करता दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी कोरोनाशी लढत आहेत.’ कोरोनाच्या वाढता संसर्गामुळे आयपीएल 2021 ला स्थगिती मिळायच्या अगोदर गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजनला सामन्यातून बाहेर जावे लागले होते.

https://twitter.com/Natarajan_91/status/1397834803651563521?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1397834803651563521%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Findian-fast-bowler-natarajaran-receives-first-dose-of-corona-vaccine-1390306

मागच्या महिन्यात नटराजनने सांगितले होते की, तो मजबूत आणि आक्रमक पुनरागमन करण्यास उत्सुक आहेत. सनरायझर्सच्या या वेगवान गोलंदाजाला माहिती आहे की, त्याला पुन्हा त्याच लयीमध्ये येण्यासाठी काही काळ लागेल. बीसीसीआयने देखील नटराजनच्या तब्येतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. आणि सांगितले की, भारतीय संघाला त्याला लवकरात लवकर संघामध्ये बघायचे आहे. सनरायझर्सने पण त्याच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे.

या 23 वर्षीय डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांचा सनरायझर्सच्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात सहभाग नव्हता. आणि या हंगामातील केवळ दोन सामने नटराजनने खेळले. त्यात त्याने दोन बळी घेतले. मात्र त्यांनतर आयपीएलचा हंगाम मध्यात आला असताना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली. त्यामध्ये सर्वांच्या सहमतीने 4 मे रोजी सर्व सामने स्थगित केले.

परंतु हे स्थगित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहेत. सर्व चाहते उत्सुक आहेत की, या वेळेसची आयपीएल 2021 च्या 14व्या हंगामातील ट्रॉफी कोण जिंकणार ते? आणि हे देखील बघणे महत्त्वाचे असेल की, नटराजन हे तंदुरुस्त होऊन आल्यानंतर संघासाठी कशाप्रकारे कामगिरी करतो.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटनंतर भारताचा भावी कर्णधार कोण? पाकिस्तानी दिग्गजाने रोहितसह घेतली ‘यांची’ नावे

मोठा पेच! आयपीएल २०२१चे उर्वरित सामने ‘येथे’ झाल्यास टी२० विश्वचषकाचे आयोजन धोक्यात?

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड बोर्डाचा ‘हा’ मोठा निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---