नुकताच दुखापतीमुळे मायदेशी परतलेला भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आज (१ जानेवारी) बाबा बनला आहे. उमेशची पत्नी तान्या वाधवा गेल्या काही महिन्यांपासून गरोदर होती. तिने नववर्षाच्या पहिल्याच दिनी गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे. हे त्यांचे पहिले अपत्य आहे. सोशल मीडियाद्वारे उमेशने सर्वांना ही गोड बातमी दिली आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर उमेशने एक फोटो पोस्ट करत लिहिले की, “या जगात तुझे स्वागत आहे माझी छोटी परी. तुझ्या जन्मावेळी मी तुझ्याजवळ उपस्थित असल्याने मला खूप आनंद झाला आहे.”
https://www.instagram.com/p/CJfqwUoFV1b/?utm_source=ig_web_button_share_sheet
Congratulations to @y_umesh on the birth of a baby girl today.
We also wish him a speedy recovery and hope to see him soon on the field 😊😊 pic.twitter.com/utpMVM6wUI
— BCCI (@BCCI) January 1, 2021
उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी
उमेशला मेलबर्न येथे दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना पोटरीची दुखापत झाली होती. याचाच परिणाम म्हणून त्याला कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात यादवची जागा घेण्यासाठी दोन गोलंदाजांची नावे शर्ययीत होती. यात युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
मात्र नुकतीच बीसीसीआयने माहिती दिली आहे की, पुढील दोन कसोटी सामन्यात उमेशच्या जागी नटराजनला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ७ जानेवारीपासून सिडनी येथे सुरु होणाऱ्या तिसऱ्या सामन्याद्वारे तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी ‘टी नटराजन’ला संधी
“तो पूर्ण तयारीसह आलाय”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केलं अश्विनचं कौतुक