भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. उमेश यादव त्याच्या भेदक गोंंलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने बांगालादेशविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात देखील अशाच प्रकारे घातक गोलंदाजी केली. उभय संघांतील हा सामना चटगांवमध्ये खेळला जात आहे. उमेशच्या चेंडूची गती विरोधकांसाठी किती घातक ठरू शकते, हे गुरुवारी (15 डिसेंबर) सकाळी दिसून आले.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात भारताने 404 धावा केल्या. बांगलादेश फलंदाजीला आला, तेव्हा उमेश यादव (Umesh Yadav) याने संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. बांगलादेशच्या डावातील चौथ्या षटकात यादव गोलंदाजीला आला आणि त्याने यासिर अली (Yasir Ali) याला तंबूत धाडले. त्याने षटकातील तिसरा चेंडू बॅक ऑफ गुड लेंथवर टाकला, जो यासिर अलीने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या आतल्या कोपऱ्याला लागून थेट स्टंप्समध्ये गेला आणि फलंदाजने विकेट गमावली. उमेशचा वेगवान चेंडू बॅटला लागून आतमध्ये घुसल्यानंतर स्टंप्स त्याच्या जागेपासून लांब जाऊन पडला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/AdnanAn71861809/status/1603296211494060033?s=20&t=Hj6k0VafKFcojyFfEQcxrw
उमेश यादव नेहमीच त्याच्या वादळी गोलंदाजीसाठी ओळखला गेला आहे. त्याने अशाच पद्धतीने त्याने यापूर्वीही विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी देखील त्याने अनेक दिग्गजांना त्रिफळाचीत केले आहे. असे असले तरी, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडून मात्र त्याच्याकडून अनेकदा यादववर दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते.
https://twitter.com/katyxkohli17/status/1603296729465438208?s=20&t=MlVqpwSQEtYeC0QxV5VMxQ
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात उमेशने गोलंदाजीसह फलंदाजीत देकील महत्वाच्या 15 धावा केल्या. या धावा करण्यासाठी त्याने दोन उत्कृष्ट षटकार देखील मारले. मेहदी हसन मिराज याच्या चेंडूवर यादनवे 100 मीटर लांब षटकार मारला. भारतासाठी पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा याने 90, तर श्रेयस अय्यर याने 86 धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने देखील अष्टपैलूची भूमिका पार पाडत 58 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. (Umesh Yadav clean bowled the batsman against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठव्या क्रमांकावर अश्विनचाच जलवा! बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ठोकले अर्धशतक
घरच्या मैदानावर ओडिशा एफसी विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, एटीके मोहन बागानचे आव्हान