ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण मिळालेल्या भारतीय संघाला पहिल्या डावात १९१ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील जोरदार आक्रमण करत इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांना लवकर माघारी धाडले होते.
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (३ सप्टेंबर) उमेश यादवने क्रेग ओव्हरटन आणि डेव्हिड मलानला बाद करत माघारी धाडले. यासह त्याने मोठा पराक्रम करत दिग्गज भारतीय गोलदाज जहीर खानची बरोबरी केली आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा गेल्या काही महिन्यांपासून संघात पुनरागमन करण्याची वाट पाहत होता. अखेर मोहम्मद शमीला विश्रांती दिल्यानंतर त्याला चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने, इंग्लंडच्या तीन मुख्य फलंदाजांना माघारी धाडले.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच ओव्हरटनला बाद करताच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. दरम्यान सर्वात कमी कसोटी सामने खेळून १५० गडी बाद करणारा तो चौथा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या विक्रमात त्याने जहीर खानची बरोबरी केली आहे.
इंग्लंडचा क्रेग ओव्हरटन हा उमेश यादवच्या कसोटी कारकिर्दीतील १५० वा बळी ठरला आहे. उमेश यादवने हा पराक्रम अवघ्या ४९ सामन्यात केला. या विक्रमात त्याने जहीर खानची बरोबरी केली आहे. जहीर खानने देखील ४९ कसोटी सामन्यात १५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
या यादीत सर्वोच स्थानी कपिल देव आहेत. कपिल देव यांनी अवघ्या ३९ कसोटी सामन्यात १५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. तसेच जवागल श्रीनाथ यांनी ४०, तर मोहम्मद शमीने ४२ कसोटी सामन्यात १५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.
सर्वात कमी सामने खेळून १५० गडी बाद करणारे भारतीय वेगवान गोलंदाज
३९ सामने – कपिल देव
४० सामने – जवागल श्रीनाथ
४२ सामने – मोहम्मद शमी
४९ सामने – उमेश यादव*
४९ सामने – जहीर खान
महत्त्वाच्या बातम्या –
ऑली पोपने शार्दुलला दिला चांगलाच चोप, एकाच षटकात ठोकले सलग ४ चौकार, पाहा व्हिडिओ
टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी कर्णधाराकडून वाकयुद्धास सुरुवात; म्हणाला…
उमेशने टाकलेल्या चेंडूने घेतली मलानच्या बॅटची कड अन् रोहितने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ