इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे.या सामन्यातील पहिल्या दिवशी (२ सप्टेंबर ) भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (३ सप्टेंबर) उमेश यादवने डेव्हिड मलानला ही माघारी धाडले.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव गेल्या काही सामन्यांपासून संधी मिळण्याची वाट पाहत होता. इंग्लंडविरुद्ध पहिल्या तीन सामन्यात देखील त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, चौथ्या कसोटी सामन्यात त्याला मोहम्मद शमी ऐवजी संघात संधी देण्यात आली आहे. या संधीचे सोने करत त्याने इंग्लंडच्या तीन मुख्य फलंदाजांना माघारी धाडले आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि ओव्हरटनला बाद केल्यानंतर उमेश यादवने डेव्हिड मलानला ही बाद करत माघारी धाडले. तर झाले असे की, २५ वे षटक टाकण्यासाठी उमेश यादव गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसरा चेंडू उमेश यादवने अप्रतिम आऊट स्विंग होणारा टाकला होता. तो चेंडू बॅटचा कडा घेत दुसऱ्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. रोहितने ही कुठलीही चूक न करता डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. मलान ३१ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला.(Umesh Yadav sent to David Malan to the pavelian, watch video)
Umesh on fire! 🔥
Gets Malan to nick one to Rohit at slip.Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Umesh #Malan pic.twitter.com/MdKd0xLu4k
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 3, 2021
भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला पलटवार, मात्र, इंग्लंडच्या शेपटाचा तडाखा
भारतीय संघाचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेले इंग्लंडचे सलामीवीर लवकर माघारी परतले होते. जसप्रीत बुमराहने रॉरी बर्न्स आणि हमीदला बाद करत माघारी धाडले होते. त्यानंतर उमेश यादवने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला त्रिफळाचित करत माघारी धाडले होते. तसेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील उमेश यादवचा जलवा सुरूच ठेवला. त्याने सुरुवातीला ओव्हटनला बाद केले त्यानंतर डेव्हिड मलानला ही बाद करत इंग्लंडच्या चिंतेत वाढ केली होती.
मात्र, त्यानंतर ऑली पोपने इंग्लंडच्या फलंदाजीची जबाबदारी हाती घेतली. त्याने जॉनी बेअरस्टोसह (३७) ८९ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर त्याने मोईन अलीसह (३५) ७१ धावांची भागीदारी करत इंग्लंडला आघाडीवर नेले. अखेर पोपला ८१ धावांवर शार्दुल ठाकूरने त्रिफळाचीत केले. मात्र, अखेरच्या विकेटसाठी ख्रिस वोक्स आणि जेम्स अँडरसनने ३५ धावांची भागीदारी करत इंग्लंडची आघाडी आणखी वाढवली. वोक्सनेही ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे अखेर इंग्लंडने २९० धावा करत ९९ धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर भारताने बिनबाद ४३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
युएईमध्ये सर्वाधिक आयपीएल सामने जिंकणारे ५ कर्णधार; रोहित ५ व्या क्रमांकावर
चाहत्यांच्या आनंदासाठी शमीने चालू सामन्यात मैदानावरच कापला केक, पाहा व्हिडिओ
रोहितचा नवा विक्रम! धोनी, गांगुलीला पछाडत ‘त्या’ विक्रमाच्या यादीत मिळवले ५ वे स्थान