बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने सर्वबाद 404 धावसंख्या उभारली. यामध्ये भारताकडून सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा (90) आणि श्रेयस अय्यर (86) यांनी केल्या. त्याशिवाय आर अश्विन यानेही 113 चेंडूत 58 धावा केल्या आणि भारताला 400च्या पुढे नेण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. यावेळी उमेश यादव याने दोन षटकार मारत नाबाद 15 धावा केल्या. त्यातील एक षटकार तब्बल 100 मीटरचा होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारताची वरची फळी थोडी डगमगली होती यामुळे भारताचा लवकरच खेळ संपेल, अशी चिंता सतावत असताना खालच्या फळीतील खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी केली. मग तो अश्विन असो वा कुलदीप यादव. या दोघांनी तर आठव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कुलदीपने 40 धावा केल्या, हे काही कमी असताना उमेशने देखील झटपट खेळी केली. तो कसोटीत नेहमीच तुफानी खेळी करण्यात ओळखला जातो. बांगलादेशविरुद्ध मारलेला षटकार हा त्या सामन्यातील सर्वात लांब षटकार ठरला आहे. त्याने त्याच्या डावातील दुसऱ्याच चेंडूवर 100 मीटरचा षटकार खेचला.
उमेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 चेंडूत 31 धावा केलेल्या कोणीही विसरणार नाही. 2019मध्ये खेळल्या गेलेल्या या खेळीत त्याने 5 षटकार मारले होते. त्याचबरोबर त्याने बांगलादेशविरुद्ध गोलंदाजीतही कमाल सुरूवात केली.
चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव सुरू असताना उमेशने यासीर अली याला त्रिफळाचीत असे केले. त्यावेळी त्याच्या चेंडूची गती इतकी होती, की स्टम्प फारच लांब उडाला. अली 4 धावा करत बाद झाला. तसेच मोहम्मद सिराज यानेही प्रभावशाली गोलंदाजी केली आहे. त्याने या सामन्यात आतापर्यंत 9 षटके टाकताना 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत.
https://twitter.com/AdnanAn71861809/status/1603311218403393536?s=20&t=c2xxd9N6Xizy2Q_zhI6Hfw
या सामन्यात भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा याला बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत दुखापत झाली होती. तो दुसऱ्या सामन्यात परतण्याची शक्यता असून सध्या मुंबईमध्ये उपचार घेत आहे.
आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-2023च्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला बांगलादेशविरुद्ध दोन्ही कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे. कारण भारताने एक जरी सामना गमावला तरी संघाच्या अडचणीत वाढ होईल. Umesh Yadav smashes 100 meter six vs Bangladesh First Test Match
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमेश यादवने उडवला बांगलादेशी फलंदाजाचा त्रिफळा, व्हिडिओ होतोय व्हायरल
विराट कोहलीच्या विकेटबाबत तैजुल इस्लामचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याची विकेट घेणे माझ्या कारकिर्दीत…’