जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीगपैकी एक असलेली कॅरिबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गुरुवारी (दि. 21 सप्टेंबर) या स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना पार पडला. हा सामना गयाना ऍमेझॉन वॉरियर्स विरुद्ध त्रिनबागो नाईट रायडर्स संघात खेळला गेला. हा सामना नाईट रायडर्सने 7 विकेट्सने जिंकला. मात्र, या सामन्यादरम्यान एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. खरं तर, या सामन्यात पंचांनी डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीना स्टाईलमध्ये गोलंदाजाची पायचीत अपील नाकारली. आता यादरम्यानच्या व्हिडिओची चर्चा जगभरात रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
झालं असं की, त्रिनबागो नाईट रायडर्स संघाच्या डावातील 5वे षटक गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाचा कर्णधार इम्रान ताहिर (Imran Tahir) याने टाकले. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मार्क दयाल याने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागली नाही आणि थेट पॅडला जाऊन धडकला.
यानंतर संघाच्या सर्व खेळाडूंनी जोरदार अपील केली आणि पंचांनी जॉनी सिना (John Cena) स्टाईलमध्ये (umpire decline appeal in john cenas style) फलंदाज नाबाद असल्याचे सांगितले. यावेळी ताहिर त्यांच्या समोर आला होता. त्यामुळे ते व्यवस्थित पाहू शकले नाहीत आणि त्यांनी फलंदाजाला नाबाद दिले. मात्र, ताहिरने त्यानंतर डीआरएस घेतला, ज्यामुळे पंचांना मार्क दयाल याला बाद घोषित करावे लागले. तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर ताहिरने जबरदस्त अंदाजात विकेटचा जल्लोष केला.
https://www.instagram.com/p/Cxc_oUYsGS3/
इम्रान ताहिर याचे स्पर्धेतील आतापर्यंतचे प्रदर्शन शानदार राहिले आहे. त्याने 11 सामने खेळताना 13 विकेट्स नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा 6.86 इतका राहिला आहे.
दुसरीकडे, सीपीएल स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना नाईट रायडर्स संघाने 7 विकेट्सने जिंकला. तसेच, स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. या सामन्यात गयानाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 166 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रायडर्सने 18.1 षटकात 7 विकेट्स ठेवून आव्हान गाठले. आता गयाना संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जमैका तलावाह्ज संघाचा सामना करेल. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअममध्ये 23 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. (umpire decline imran tahirs appeal in john cenas style during qualifier 1 cpl 2023 see video here)
हेही वाचाच-
मोठी बातमी! विश्वचषक 2023पूर्वी भारतीय दिग्गज बांगलादेशच्या गोटात, संघाकडून मिळाली सर्वात खास जबाबदारी
‘मलाही एकदा तरी…’, विश्वचषकात खेळण्याविषयी शुबमनची मन जिंकणारी प्रतिक्रिया, तुम्ही वाचली का?