---Advertisement---

भारत-श्रीलंका सामन्यानंतर हे दिग्गज अंपायर घेणार निवृत्ती!

---Advertisement---

लीड्स। आज(6 जूलै) 2019 विश्वचषकात हेडींग्ले स्टेडीयमवर भारत विरुद्ध श्रीलंका संघात 44 वा सामना सुरु आहे. हा सामना इंग्लिंश पंच इयान गोल्ड यांचा पंच म्हणून शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर ते निवृत्ती घेणार आहेत.

गोल्ड यांनी आत्तापर्यंत 74 कसोटी सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. तसेच आजचा वनडे सामना हा त्यांचा पंच म्हणून 140 वा वनडे सामना आहे. त्यांनी 37 टी20 सामन्यातही पंच म्हणून काम केले आहे.

त्याचबरोबर 2019 चा विश्वचषक हा गोल्ड यांचा पंच म्हणून चौथा विश्वचषक आहे. त्यांनी 2011 च्या विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या उपांत्य सामन्यातही पंच म्हणून काम पाहिले होते. तसेच ते 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही पंच होते.

आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये समावेश असणारे गोल्ड यांनी 13 वर्षांपूर्वी 2006 मध्ये इंग्लंड आणि श्रीलंका संघात साऊथँम्पटनमध्ये झालेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पहिल्यांदा काम केले होते.

त्यानंतर पुढच्या 5 दिवसात इंग्लंड आणि श्रीलंका संघातच झालेल्या वनडे सामन्यातून वनडेमध्येही पंच म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्याच्या पुढच्याच वर्षी 2007 मध्ये झालेल्या विश्वचषकातही ते पंच होते.

गोल्ड यांनी यापूर्वी इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून 18 वनडे सामनेही खेळले आहेत. तसेच त्यांनी ससेक्स, मिडलसेक्स या संघाकडूनही क्रिकेट खेळले आहे. त्यांनी मिडलसेक्स संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.

त्यांनी 1883 च्या विश्वचषकात इंग्लंडकडून यष्टीरक्षण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी आणि अ दर्जाचे क्रिकेट मिळून 613 सामने खेळले असून यामध्ये मिळून त्यांनी 13133 धावा केल्या आहेत. पण त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूपेक्षा पंच म्हणून अधिक ओळख मिळाली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

शमीनंतर असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह दुसराच भारतीय गोलंदाज!

विश्वचषकात टीम इंडियाच्या बाबतीत असे पहिल्यांदाच झाले

टीम इंडियाची सुपरफॅन आजी आज पून्हा मैदानात!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment