दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज पंच मारायस इरास्मस यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना त्यांच्या दोन दशकांहून अधिक काळ गाजलेल्या कारकिर्दीचा अंतिम सामना असेल.
क्राइस्टचर्च कसोटी सामना पंच म्हणून इरास्मस यांचा 82 वा पुरुष कसोटी सामना आहे. यासह ते सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये पंचांची भूमिका निभावणाऱ्यांच्या यादीत 10 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. इरास्मस 124 पुरुष एकदिवसीय सामने, 43 पुरुष टी 20 सामने आणि 18 महिला टी 20 सामन्यांमध्ये पंच राहिले आहेत. यासह त्यांनी 131 आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये टीव्ही अंपायर म्हणूनही काम पाहिलंय.
मारायस इरास्मस यांनी चार पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक (2011, 2015, 2019, 2023), सात पुरुष टी-20 विश्वचषक (2009, 2010, 2012, 2014, 2016, 2021 2022) तसेच असंख्य प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहिलं आहे. ते 2013 आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी व तीन महिला टी-20 विश्वचषक (2010, 2012, 2014) स्पर्धेमध्ये पंच होते.
इरास्मस यांच्या कारकिर्दीतील सर्वात स्मरणीय क्षण म्हणजे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील 2019 विश्वचषकाचा अंतिम सामना! हा सामना दोन वेळा टाय झाल्यानंतर बॉन्ड्री काऊंटवरून विजेता ठरवण्यात आला होता. याशिवाय अलीकडेच बांग्लादेशविरुद्ध श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला ‘टाईम आऊट’ बाद घोषित करण्यात आलं होतं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या सामन्यातही इरास्मस पंच म्हणून होते. अशाप्रकारे त्यांचं नाव क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं आहे.
मारायस इरास्मस यांची 2010 मध्ये ICC पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ते रॉड टकरसह या यादीत सर्वात जास्त काळ कार्यरत असलेले वर्तमान पंच बनले होते. यापल्या ऐतिहासिक कारकिर्दीत इरास्मस यांनी 2016, 2017 आणि 2021 मध्ये ‘ICC अंपायर ऑफ द इयर’साठी दिली जाणारी प्रतिष्ठीत ‘डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी’ जिंकली आहे. आपल्या प्रवासाबाबत आयसीसीशी बोलताना इरास्मस यांनी त्यांच्या कार्यकाळातील संधी आणि आठवणींसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या-
सामन्यादरम्यान मिळाली होती गळा कापण्याची धमकी! जाणून घ्या युवराज सिंगच्या विक्रमी 6 षटकारांची कहानी
अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
सचिन-युवीची अखेरपर्यंत झुंज, व्हिव्ह रिचर्ड्सचं अजरामर शतक; भारतात कसोटीतील 5 सर्वोत्तम रन चेज