इंग्लंडचे पंच मायकल गॉ यांच्यावर आयसीसीने सहा दिवसांसाठी प्रतिबंध लावले आहेत. मायकल टी-२० विश्वचषकादरम्यान कोरोनाच्या नियामांचे उल्लंघन करून बायो बबलच्या बाहेर गेले होते. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. ते सध्या सहा दिवसांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत आहेत. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली जाईल आणि यामध्ये त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर ते पुन्हा पंचाचे काम करू शकतील, अशी माहिती मिळाली आहे. सहा दिवसांच्या विलगीकरणानंतर आयसीसी त्यांच्याविषयी काय भूमिका घेते, हेदेखील पाहावे लागणार आहे.
वृत्तसंस्था द डेली मिररने या घटनेची माहिती दिली आहे. माहितीनुसार डरहमचे माजी फलंदाज आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ पंचांपैकी एक असलेले मायकल गॉ यांनी यूएईत कोरोनाच्या बायो बबलचे उल्लंघन केले आणि आयसीसीच्या सुरक्षा समितीने त्यांना या गोष्टीसाठी दोषी ठरवले आहे. आयसीसीच्या सूत्रांच्या हवाल्याने द डेली मिररने सांगितले आहे की, “जैव सुरक्षा सल्लागार समितीने पंच मायकल गॉ यांना कोरोनासारख्या सुरक्षा प्रोटोकॉलच्या उल्लंघनासाठी सहा दिवसांच्या विलगीकरणात राहायला सांगितले आहे.”
रविवारी (३१ ऑक्टोबर) विश्वचषकात खेळल्या गेलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी मायकल गॉ पंचाची भूमिका पार पाडणार होते, पण त्यांच्यावर आयसीसीने कारवाई केल्यामुळे ते या सामन्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या जागी दक्षिण अफ्रिकाचे मराइस अरास्मस यांनी पंचाची भूमिका पार पाडली. मायकल गॉ संध्या हॉटेल रूममध्ये विलगीकरण कालावधी पूर्ण करत आहेत. त्यांची प्रत्येक दोन दिवसाला चाचणी केली जात आहे. सहा दिवस पूर्ण केल्यानंतर आणि त्यांचा कोरोना अहवाला निगेटीव्ह आल्यानंतर ते मैदानात दिसू शकतात.
दरम्यान, रविवारी पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दारून पराभव केला. न्यूझीलंडने हा सामना आठ विकेट्स राखून जिंकला. या पराभवानंतर भारत स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. तर दुसरीकड न्यूझीलंडने स्पर्धेतील त्यांचे स्थान भक्कम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारतीय संघामध्ये दोन गट आहेत. एक कोहलीसोबत, तर दुसरा त्याच्या विरोधात”
‘मला आधीच माहीत होते की, ते संघर्ष करणार आहेत’, माजी दिग्गजाचे विराटसेनेवर टीकास्त्र
लाजिरवाण्या पराभवासह बांगलादेश विश्वचषकातून ‘आऊट’; नॉर्किए-रबाडाची भेदक गोलंदाजी