इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडींग्ले मैदानात पार पडला. या सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघ खराब स्थितीत होता. मात्र तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारतीय संघाचा डाव थोडासा सावरला. यादरम्यान पुजाराने मारलेला एक शॉट चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
झाले असे की, ७९ व्या षटकात मोइन अली गोलंदाजीसाठी आला होता. तेव्हा त्याने पूजाराला शॉर्ट पीच गोलंदाजी केली. ज्याच्या प्रत्युत्तरादाखल पुजाराने देखील स्क्वेअर लेगला एक जोरदार शॉट खेळला. ज्यामुळे लेग साईडला पंचांची भूमिका निभावत असलेले रिचर्ड कॅटलबोरो हे चेंडू लागण्यापासून थोडक्यात वाचले.
पुजाराने मारलेला चेंडू आपल्याकडे येत असल्याचे पाहताच त्यांनी खाली वाकून स्वतःला चेंडू लागण्यापासून वाचवले. नाहीतर पुजाराने मारलेला हा शॉट सरळ कॅटलबोरो यांच्या डोक्याला लागला असता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/sportzhustle/status/1431305773838073856
दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडने ४३२ धावा करुन ३५४ धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा सलामीचा फलंदाज केएल राहुल (०८) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराने यावेळी मात्र चांगली खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
Pujara pulls fiercely, almost smacking the square leg umpire on the head. Had to duck quickly out of the way!
😂😂🔥#INDvENG pic.twitter.com/JGaoVqvLef— Nemi 💫 (@NemiGulati) August 27, 2021
ज्यानंतर रोहित शर्मा देखील ५९ धावसंख्येवर ऑली रोबिन्सनच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन बाद झाला. नंतर कर्णधार विराट कोहलीने देखील पुजारा सोबत चांगली भागीदारी केली. मात्र, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पुजारा ९१ धावा करुन आणि विराट ५५ धावांवर बाद झाले. त्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला टिकून फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. याचमुळे इंग्लंडने हा सामना १ डाव आणि ७६ धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी आघाडी मिळवली.
महत्वाच्या बातम्या –
–मैदानात घुसखोरी केलेल्या भारतीय चाहत्यावर केली गेली ‘कडक कारवाई’
–रहाणे नसता, तर विराटचे अर्धशतक झळकावणे होते कठीण, वाचा काय घडले नक्की
–जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताची तिसऱ्या क्रमांकावर घसरण, ‘हा’ संघ पोहोचला अव्वलस्थानी