---Advertisement---

वर्ल्डकप सेमी-फायनल्ससाठी पंचाची घोषणा, भारत-न्यूझीलंड सामन्यात दिसणार रिचर्ड…

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची साखळी फेरी समाप्त झाली आहे. स्पर्धेच्या अखेरच्या आठवड्यांमध्ये दोन उपांत्य फेरी व अंतिम सामना खेळला जाईल. उपांती फेरीसाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पंचांची व सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.

साखळी फेरीत अव्वलस्थानी राहिलेला भारतीय संघ व चौथ्या स्थानी समाप्ती केलेल्या न्यूझीलंड यांच्या दरम्यान पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. मुंबईचा वानखेडे स्टेडियम येथे 15 नोव्हेंबर रोजी हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ व रॉड टकर हे मैदानी पंच म्हणून काम पाहतील. तर तिसरे पंच म्हणून जोएल विल्सन दिसतील. तर चौथे पंच ऍड्रियन होलस्टोक हे असणार आहेत ‌ सामनाधिकाऱ्याची भूमिका या सामन्यात ऍंडी पायक्रॉफ्ट हे बजावणार आहेत. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून भारताच्या नॉक आउट सामन्यांमध्ये पंच म्हणून दिसणारे रिचर्ड केटलब्रो या सामन्यात कोणत्याही भूमिकेत नसतील.

तर दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा उपांत्य फेरीचा दुसरा सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. या सामन्यात रिचर्ड केटलब्रो व भारताचे नितीन मेनन हे मैदानावरील पंच असणार आहेत. तिसरे पंच म्हणून ख्रिस गॅफनी व चौथे पंच मायकल गॉफ असतील. तर सामनाधिकारी म्हणून भारताच्या जवागल श्रीनाथ यांना मान मिळाला आहे. मागील अनेक वर्षांपासून आयसीसीच्या नॉक आऊट स्पर्धांमध्ये पंचगिरी करणारे कुमार धर्मसेना यावेळी या उपांत्य फेरीमध्ये नसतील.

(Umpires And Match Officials Annouced For ODI World Cup Semi Finals No Kettleborough No Dharmasena)

हेही वाचा-
गुरबाजने केलेली अहमदाबादच्या गरीब लोकांची मदत; पाहून शशी थरूरही म्हणाले, ‘हृदयासारखं तुझं करिअरही…’
पाकिस्तानी खेळाडूची राहुलविषयी ‘ही’ प्रतिक्रिया वाचून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; म्हणाला, ‘जगातील…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---