विश्वचषकातील विराट कोहली याचा शतकाचा दुष्काळ संपला आहे. त्याने 2015 मध्ये स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विश्वचषकातील शेवटचे शतक झळकावले होते. 2019 मध्ये विराटने अनेकवेळा 50 धावा केल्या पण शतक करता आले नाही. आता विराटने विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक पूर्ण केले. मात्र, त्याच्या शतकावरून बरेच वाद होत आहेत. कारण विराटच्या शतकापूर्वी पंच रिचर्ड केटलबोरो यांनी लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला वाइड दिले नाही.
नक्की काय झालं होतं?
विराट कोहली (Virat Kohli) 97 धावांवर खेळत असताना भारताला विजयासाठी 2 धावांची गरज होती आणि त्याला शतक करण्यासाठी 3 धावांची गरज होती. डावखुरा फिरकी गोलंदाज नसुम अहमदने विराटला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. विराट निराश झाला, पण पंच रिचर्ड केटलबaरो (Richard Kettleborough) यांनी चेंडू वाइड (Wide Ball) दिला नाही. दोन चेंडूंनंतर विराटने षटकार मारून वनडेतील 48वे शतक पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला.
डावातील 42व्या षटकात विजयासाठी 2 धावा शिल्लक असताना विराट कोहलीला शतकासाठी तीन धावा आवश्यक होत्या. त्यावेळी बांगलादेशचा फिरकीपटू नसूम अहमदने विराटला वाइड चेंडू टाकला. त्यामुळे एक धाव कमी होतोय की काय? अशी भीती विराटसह सर्व क्रिकेट चाहत्यांना वाटू लागली. त्याच भावनेनं विराटनं पंच रिचर्ड केटलबोरो यांच्याकडे पाहिलं, पण त्यांनी वाइड चेंडू दिलाच नाही आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
विराट कोहलीला शतक झळकावण्यासाठी केटलबोरो यांनी चेंडू वाइड दिला नाही, असा अनेकांचा समज होता. त्यामुळे पंचांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. परंतु एक मुद्दा असा आहे की, 2022 मध्ये क्रिकेटच्या नियमांमध्ये केलेला बदल हे वाइड न देण्यामागे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे हा नियम पाहणे गरजेचे आहे.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आधुनिक खेळात, फलंदाज आता चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजमध्ये बरीच हालचाल करतो, एमसीसीने गेल्या वर्षी एका निवेदनात म्हटले आहे की, गोलंदाजाने रनअप सुरू केल्यावर फलंदाज जिथे उभा होता, त्या ठिकाणाहून जर चेंडू गेला, तर त्याला वाइड म्हणता येणार नाही. नियम 22.1 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, जेणेकरुन गोलंदाजाने रनअप सुरू केल्यावर फलंदाज कोठे उभा आहे यावर चेंडू वाइड आहे की, नाही हे ठरवले जाईल. (umpire’s decision not to give the ball wide to Virat right or wrong See what the ICC rules say)
हेही वाचा-
Breaking: 4 आयपीएल ट्रॉफी विजेता मलिंगा पुन्हा मुंबई पलटणच्या ताफ्यात, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी
पंड्याबाबत धक्कादायक ब्रेकिंग! बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? खुद्द बीसीसीआयने दिली माहिती