इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात रविवारी (१० जुलै) ट्रेंट ब्रिज येथे तिसरा टी२० सामना खेळला गेला. हा सामना जिंकत भारतीय संघाला ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याची संधी होती. तर इंग्लंडचा संघ विजयासह मालिकेचा शेवट करण्यासाठी प्रयत्नशील दिसला. या सामन्यात भारताकडून युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याचा नमुना सादर केला.
आयपीएल २०२२ दरम्यान आपल्या चेंडूच्या गतीने उमरानने (Umran Malik) सर्वांना प्रभावित केले होते. त्याने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दुसरा सर्वात वेगवान चेंडू फेकण्याची करामत केली होती. त्याने तब्बल १५७.०० किमी दर ताशी वेगाने चेंडू फेकला होता. त्याच्या याच वेगवान गोलंदाजीच्या जोरावर जून २०२२ मध्ये आयर्लंडविरुद्ध त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली होती.
त्यानंतर आता आपल्या दुसऱ्या परदेशी दौऱ्यावर अर्थात इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यातही (Third T20I) त्याने आपल्या गतीचा नमुना सादर केला. त्याने आपल्या पहिल्याच इंग्लंडच्या डावातील दुसऱ्या षटकात तब्बल १४७ किमी दर ताशी वेगाचा चेंडू फेकला. यावेळी इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय स्ट्राईकवर होता. त्याने हा चेंडू अलगद मारला आणि त्यावर एक धाव चोरली. उमरानचा हा चेंडू इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यादरम्यान कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाने टाकलेला सर्वात वेगवान (Fastest Delivery In England) चेंडू ठरला आहे.
Umran Malik reached 147 kph today. That is the highest speed ever achieved by an Indian pace bowler in a T20I played in England #ENGvIND
— The CricViz Analyst (@cricvizanalyst) July 10, 2022
असे असले तरीही, इंग्लंडच्या फलंदाजांनी उमरानची चांगली धुलाईही केली. त्याने या सामन्यात आपल्या कोट्यातील ४ षटके फेकताना १ विकेट घेतली. सलामीवीर जेसन रॉयला त्याने २७ धावांवर झेलबाद केले. मात्र यादरम्यान त्याने ५६ धावा खर्च केल्या.
त्याच्याखेरीज अनुभवी फिरकीपटू रविंद्र जडेजा यानेही महागडी गोलंदाजी केली. ४ षटकांमध्ये ४५ धावा देत तो एकही विकेट घेऊ शकला नाही. तसेच आवेश खाननेही ४३ धावा देत फक्त १ विकेट घेतली. याउलट रवी बिश्नोईने केवळ ३० धावा खर्च करत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. यातील डेविड मलानची (३९ चेंडू ७७ धावा) विकेट सर्वात मोठी राहिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
SLvsAUS Test: दिनेश ऍण्ड रमेश ऑन द क्रिज, चंडिमलच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला टाकले बॅकफूटवर
जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी भिडणार भारतीय खेळाडू, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगणार थरार
‘तू पूर्ण तंदुरूस्त आहेस का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना भुवनेश्वर म्हणाला, ‘सॉरी पण मी…’






