सध्या भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेबद्दलच एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती गोष्ट म्हणजे युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या गोलंदाजीची गती. उमरानने आपल्या गतीने प्रत्येकाला भुरळ पाडली आहे. ज्या गतीने उमरानने आयपीएलमध्ये गोलंदाजी केली त्याची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा झाली. त्याचवेळी, भारतीय संघात सामील झाल्यानंतरही उमरान मलिक नेटमध्ये आपल्याच वेगानं फलंदाजांना खूप त्रास देत आहे. अलीकडेच उमरान मलिकने इतकी वेगवान गोलंदाजी केली की, भारतीय कर्णधार रिषभ पंतची बॅट तुटली.
उमरान मलिकने (Umran Malik) भारतीय संघाच्या नेट सत्रात ताशी १६३.७ किमी वेगाने गोलंदाजी केली. वेग मोजणाऱ्या यंत्राचे चित्रही समोर आले असून त्यात उमराणचा वेग लिहिला होता. त्यानंतर आता त्याने रिषभ पंतची (Rishabh Pant) बॅट तोडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वास्तविक उमरान मलिक नेटमध्ये रिषभ पंतला गोलंदाजी करत होता. यादरम्यान त्याने एक चेंडू इतका वेगात टाकला की त्याचा बचाव करताना पंतची बॅट तुटली. उमरान पंतकडे बघत उभा राहिला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
https://www.instagram.com/reel/CegVsFSFYII/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, उमरान मलिकची आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी होती आणि याच कारणामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. उमरानने गेल्या हंगामात १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील तो दुसरा वेगवान गोलंदाज होता. उमरान मलिकने १५७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. मात्र, उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्याऐवजी आवेश खानला संधी देण्यात आली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला धोनीच्या डोक्यात जायचंय’, वाचा असं का म्हणाला दिनेश कार्तिक
अँडरसनच्या आधी बोल्टने केली मुरलीधरनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी