बुधवारी (६ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद संघाने ४ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघातील एका युवा गोलंदाजाने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून उमरान मलिक आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघातील वेगवान गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉसिटिव्ह आल्यानंतर उमरान मलिकला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले. परंतु, या सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आली नाही. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने केेएस भारतला बाद केले. यासह १५३ गतीचा चेंडू टाकून आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम देखील केला.
भाजी आणि फळ विकायचे उमरानचे वडील
कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात उमरानने पदार्पण केल्यानंतर त्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “आमचे कुटुंब खूप गरीब आहे. मी एक अतिशय साधा व्यक्ती आहे आणि माझे भाजी आणि फळांचे दुकान आहे. भाजी विक्रेता म्हणून ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की , “माझ्या मुलाचा मला अभिमान आहे. एलजी साहेबांनी सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या. मी प्रार्थना करतो की माझा मुलगा त्याच्या कारकिर्दीत यशाची उंची गाठेल.”
Heartiest congratulations to Umran Malik on IPL debut today from the Sunrisers Hyderabad Team. You have made the entire Jammu Kashmir proud. You are the inspiration for many young cricketers. Best wishes for your cricket career ahead. pic.twitter.com/Aau4ZcGNKh
— Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) October 3, 2021
“तो जेव्हा ३ वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याचे स्वप्न होते की, त्याने क्रिकेटपटू व्हावे. त्याची सनरायझर्स हैदराबाद संघात निवड झाल्यानंतर आम्ही भावूक झालो होतो. आम्ही टीव्ही समोर बसून सामना पाहत होतो. त्यावेळी आमच्या डोळ्यात अश्रू येत होते. माझ्या मुलाने खूप मेहनत घेतली आहे. अशी प्रार्थना करतो की, एक दिवस तो भारतीय संघासाठी खेळेल,” असे उमरान मलिकचे वडील माध्यमांशी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकपद का नाकारले? वसीम अक्रम म्हणाले, ‘मी मूर्ख नाही…’
टी२० विश्वचषकात भारतासाठी ‘हे’ खेळाडू ठरतील हुकुमी एक्के, ‘मालिकावीर’ बनण्याचे आहेत प्रबळ दावेदार!